पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेल्या लढा माझ्या शेतकऱ्याचा या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Rashtrawadi Congress party
सत्ताधारी सरकारच्या वतीने सामान्य जनतेची ज्या पध्दतीने पिळवणुक होत आहे यामुळे जनतेत मोठया प्रमाणात रोश असल्यामुळे या यात्रेत मोठया प्रमाणात नागरीक सहभागी होत असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले. देशातुन मोठया प्रमाणात कापसाचे आयात होत असल्याने कापसाला भाव मिळत नाही. सध्या संत्रा व मोसंबीला मातीमोल भाव मिळत आहे. बांग्लादेशला संत्रा पाठविण्यासाठी अगोदर 18 रुपये कर लागत होता. आता तोच कर 108 रुपये झाला आहे. यामुळे संत्रा व मोसंबीची निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सोयाबीन तेल व सोयापेंड मोठया प्रमाणात आयात करण्यात येत असल्याने सोयाबीनला भाव मिळत नाही. नुकसान होवूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. पिक विमा कंपनीकडुन जाचक अटी लावुन मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. Ladha majhya shetkaryacha
दुसरीकडे खते, फवारणीचे औषध, शेतकी अवजारे यांच्यावर मोठया प्रमाणात जि.एस.टी. लावल्याने त्याचे भाव वाढले आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बाजारात आज जो शेतमालास भाव मिळत आहे त्यातुन साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. खाण्याच्या तेला पासुन ते मिठापर्यत सर्वच वस्तुंच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व विषय घेवून अनिल देशमुख व सलील देशमुख यांनी हि यात्रा काढली आहे.
यात्रेचा हा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड या यात्रेने सोमवारी अर्धा टप्पा पार केला असून ३० गावातुन ही यात्रा गेली आहे. या यात्रेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सामान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थीत राहत आहे. ज्या गावात ही यात्रा मुक्कामी असते तेथे सलील देशमुख यांची भेट घेण्यासाठी परिसरातील नागरीक मोठया संख्येने येत असून त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कसा त्रास होत आहे हे सांगत आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…