जिद्द आणि मेहनत यशा अंगी बाळगावी: तहसिलदार रुपाली मोगरकर यांचे प्रतिपादन.
राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाटण:- येथील आर्या दि बेस्ट युनियन पब्लिक अकॅडमी तर्फे तालुक्यातील वेगवेगळ्या विभागात यश प्राप्त केलेल्या नामवंताचे सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील मडावी हे होते, उद्घाटक म्हणून रूपाली मोगरकर तहसिलदार, प्रमुख मार्गदर्शक डॉ.संभाजी वारकड प्रमुख पाहुणे म्हणून सीताराम मडावी सरपंच, गणेश शेटकर उपसरपंच, गणपत राठोड,गणपत सलगर, राम सलगर, प्रभू पळनाटे, एकरू राठोड, रुख्मिणी सळगर, सुलोचना पळनाटे, राधा सावंत, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पाकावार ऋतिका जव्हारे यांनी केले. प्रास्तविक हीनेश जाधव सर यांनी केले. आभार प्रदर्शन करण कोमले यांनी केले.
सदर कार्यक्रम पाटण येथे गेल्या 12 वर्षापासून सुरू असलेल्या 667 विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अकॅडमी मध्ये रूपाली मोगरकर तहसिलदार जिवती, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तयारी व यश मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावे याबाबत स्वतःचे अनुभव सांगताना जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल असे मोलाचे मार्गदर्शन करून अतिशय मागास व अतिदुर्गम आदिवासी अशा क्षेत्रात अकॅडमी चे संचालक यांनी स्पर्धा परीक्षेची संकल्पना विचारात आणून शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल व या प्रशिक्षणात शिस्त व नागपूर, पुणे, यवतमाळ, नांदेड, लातूर, चंद्रपूर अश्या जिल्ह्याचे विद्यार्थी पाटण सारख्या गावात जिथे कोणत्याच प्रकारची व्यवस्था नसताना कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता हे अस्तित्व निर्माण केल्याबद्दल जिवती तालुक्याची स्तुती केली.
यावेळी डॉ.संभाजी वारकड यांनी प्रशिक्षणार्थी यांनी एक विद्यार्थी पासून प्राचार्य प्रवास कस घडला याबाबत माहित देत असताना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक अडचणी आल्यातरी आपण ठरविलेला ध्येय सिद्ध करण्यासाठी ध्येयवेडा झाले पाहिजे, वेळेचं नियोजन करून टार्गेट पर्यंत कस पोहचता येईल तसेच सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल, अपयश ही यशाची पहिली पायरी असून कदाचित अपयश आल्यास खचून न जाता आत्मविश्वासाने , जिद्दीने, आपल्या आई वडील यांचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न केल्यास यश आपोआप तुमच्या पदरी पडेल असे अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात आम्ही खूप मोठे भाग्यवान आहोत की आमच्या पाटण सारख्या गावात एक नौकरी देण्याचं केंद्र सुरू आहे. जिवती सारख्या तालुक्यातून आणि राज्यभर पाटण या गावाचा नाव रोशन होत आहे तसेच गावाचा आर्थिक, शैक्षणिक विकास होत असल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक गरीब मुल ज्यांना शहरा सारख्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेणे शक्य नाही अश्या सर्व जाती जमातीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतले पाहिजे असे आव्हान करत असताना शोभा मडावी सारखी कोलाम समाजातील पहिली पोलिस महिला कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून आमच्या ईतर मुलामुलींना प्रेरक ठरणार आहे. शिक्षणात कधीच गरीबी अडचण येत नसून तीच आपली खरी श्रीमती आहे हे शोभा या मुलीने करून दाखविले तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना विविध क्षेत्रात नौकरी मिळविलेल्या चे सत्कार, गौरव करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य अकॅडमी कडून सातत्याने करत राहावे.
कार्यक्रमात 5 व्यक्तीचे सत्कार करण्यात आले. त्यात डॉ.पांडुरंग सावंत यांनी जिवती सारख्या तालुक्यातून आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. गजानन पळनाटे यांनी अतिशय बिकट परिस्थितीत पोलिस उपनिरीक्षक पद प्राप्त केल्याबद्दल कुटुंबासह सत्कार करण्यात आला. गोपीनाथ सलगर पोलिस उपनिरीक्षक पद प्राप्त केल्याबद्दल. शोभा मडावी कोलाम समाजातील पहिली महिला पोलिस. प्रणय राठोड इंडीयन आर्मी मध्ये यश प्राप्त केल्याबद्दल या सत्कार करण्यात आला.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…