राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराची घोषणा होणार म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना विधानसभा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत.
त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपा संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी समोर येत आहे.
ही आहे निश्चित उमेदवारांची नावे
नाना पटोले – साकोली, विरेंद्र जगताप- धामणगाव, यशोमती ठाकूर- तिवसा, विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी, अमित झनक- रिसोड, नितीन राऊत- उत्तर नागपूर, विकास ठाकरे – पश्चिम नागपूर, रणजित कांबळे- देवळी / पुलगाव, सुभाष धोटे- राजूरा, डॉ. सुनील देशमुख – अमरावती शहर, बबलू देशमुख- अचलपूर
पण विदर्भातील जागांवरून वाद: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्षात विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यास तयार आहे. या भागात आमची ताकद जास्त असून आम्हीच या भागातून अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी अनेक बैठका पार पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आता या जागांवर जवळपास तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…