राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले होते. यावेळी आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिले होते. पण मशाल या चिन्हामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल करण्याची मागणी केली होती. त्यात निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह देण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालच चिन्ह कायम ठेवण्यात आले असून आयस्क्रीमच्या कोनासारखे वाटणारे चिन्ह आता बॅटरीसारखे दिसणार आहे. मशाल हातात धरण्याचा जो आकार होता तो आईस्क्रीमच्या कोनासारखा वाटत होता. तो बदलून आता वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच आतील भगवा रंग काढण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी 2024 च्या वेळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. मशाल हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसते असे विरोधकांनी म्हटले होते. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये टॉर्च स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही टॉर्च सारखेच दिसणारे नवे निवडणूक चिन्ह दिसणार आहे.
पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा खूप आधी पासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने 1985 मध्ये पेटत्या मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. यानंतरच्या काळात रेल्वे इंजिन, ताडाचे झाडाची जोडी, धनुष्यबाण आदी चिन्हे शिवसेनेला मिळत गेली.
शिंदे गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देताना आयोगाने ठाकरे गटाला पर्याय विचारले होते. तेव्हा ठाकरे गटाने पेटत्या मशालीचा पर्याय आयोगाला दिला होता. याच चिन्हावर ठाकरेंनी लोकसभा लढविली होती. आता थोडासा बदल असला तरी नवे चिन्ह ठाकरेंच्या उमेदवारांच्या प्रचारात आणि बॅनरवर दिसू लागले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…