उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली याचे तर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी श्रावस्ती विहार मध्ये अशोका विजयादशमी चे दहा दिवस महामातांच्या शौर्याचा कर्तृत्वाचा गौरवाचा विचाराचा जागर करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर पासून व्याख्यान मालेस सुरुवात झाली.
तीन तारखेस प्रामुख्याने पहिला दिवस प्रा. सुनीता धममकिर्ती यांनी महामाता खेमां बुध्द कालीन महिला यांचेवर व्याख्यान दिले. दिवस दुसरा शैलजा साबळे यांनी माता उतरा नंद यांचेवर व्याख्यान दीले. दिवस तिसरा अवंतिका वाघमारे यांनी पट्टाच्यारा यांचेवर व्याख्यान दीले. चौथा दिवस उषा कांबळे यांनी भद्रा कांचन यशोधरा यांचे महापरिनिर्वाण कन्या धम्म ज्योती यांचेवर व्याख्यान दिले. दिवस पाचवा दीपमाला कांबळे यांनी भद्रा कुंडल केसा यांचेवर व्याख्यान दिले सहावा दिवस सरिता कांबळे यांनी आम्रपाली यांचेवर व्याख्यान दिले सातवा दिवस अर्चना लांडगे यांनी पूनिका यांचेवर व्याख्यान दिले. आठवा दिवस चेतना नागवंशी यांनी रोहिणी यांचेवर व्याख्यान दिले नववा दिवस सपना भिसे यांनी सुंदरी यांचेवर व्याख्यान दिले.
त्याच प्रमाणे हेल्थ केअर मधे विद्यालक्ष्मी राज हंस यांनी आक्यु प्रेशर यांचेवर माहिती दिली. डॉ. मनीषा जमणे यांनी डोळ्याचे आरोग्य संरक्षण यांचेवर माहिती दिली. आशा रीतीने कार्यक्रम सफल झाला. या व्याख्यान मालेच उद्घाटन माजी नगरसेविका शेवंता वाघमारे यांच्या उपस्थित उत्साहात झालं. यावेळी शेवंता वाघमारे म्हणाल्या इतका सुंदर कार्यक्रम राबवला. मला जर संधी मिळाली असती तर मी आम्रपाली सादर केली असती अशी इच्या व्यक्त करणेत आली. त्यानंतर दहाव्या दिवशी अशोका विजयादशमी दसरा आणि 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
2500 वर्षा पूर्वी आम्ही मानव म्हणून जन्माला आलो असलो तरी आम्हाला लिहिण्याचा बोलणेच माणूस म्हणून जगणेच हक्क नव्हता ही जाणीव सर्व प्रथम महाडच्या सत्याग्रहानी करून दिली आणि अशोका विजया दशमी दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून आम्हाला देऊन आम्हाला माणसात आणल धम्म स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि एकात्मता मैत्री करून देऊन जगण्याचा अधिकार देणाऱ्या हक्क देणाऱ्या आजच्या दिना निमित्त तमाम धम्म बांधव आणि भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजन प्रा. कुलवीऱ कांबळे आणि माजी नगरसेवक ठोकळे तसेच माजी नगरसेवका शेवंता वाघमारे यांच्या हस्ते करून करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिपमाला कांबळे यांनी करून दीला. यावेळी प्रा. कुलवीर कांबळे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबडकरांचा नवबौद्ध धम्म ही एक क्रांतीकारी सामाजिक पूनरुजिवन बौध्द चळवळ आहे. 14 ऑक्टोंबर 1956 या दिवशी नवबौध्द धम्माचा उदय झाला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या अनुयायी सह नव बौद्ध धम्म स्वीकारला ही जाती व्यवस्था ही मानवी मुक्तीची चळवळ आहे जाती व्यवस्था ही जी इतर जाती बद्दल पूर्वग्रह निर्माण करते आणि याच पूर्वग्रहनी भारतीय समाजातील सर्व सामाजिक संबंध व्यापले आहेत आणि यामुळे सर्व जाती व्यवस्थेबाबत पूर्वग्रह अशा पद्धतीने चालतो की निम्या जातीचे लोक बहिष्कृत आणि शोषित होतात. आधुनिक काळामध्ये भारतात नवयान बौध्द धम्म आवश्यक आहे. करणं आधुनिकतेने जगाला दिलेले सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणजे शिक्षण बाजार आणि राज्य हे भारतीय समाजात निम्न जातीचे सौरक्षण देणेत किंवा न्याय देणेत अपयशी ठरले आहे ते साधन भारतीय समाजात बदल घडवून आणू शकत नाही ही सुविधा न कायद्याने हा धर्म निरपेक्ष आहे. जो कोणी ही मोडू शकत नाही तर बंधू भाव किंवा धर्म पवित्र आहे ज्याचा प्रत्येकानी आदर केला पाहिजे असे डॉ बाबासाहेब नच मत आहे म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह स्वीकारलेला नव बौध्द धम्म हिंदू धर्मांनी निर्माण केलेल्या जातीचा विषमतेचा पवित्र सामाजिक नैतिकतेचा प्रतिकार करणेसाठी सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत आहे त्यामुळे मानवाची सर्वच प्रकारच्या गुलामीतून मुक्ती होऊ शकते व त्याचे मानवी मूल्य अबाधित राहू शकते डॉ. बाबासाहेबांनी धम्मला समता आणि मुक्तीची शक्ती म्हणून पाहिले व संशोधनात्मक लेख डॉ बाबासाहेब आंबडकरांच्या नव बौध्द धम्माच्या स्विकराचा शोध घेतो.
त्यानंतर डॉ. सुधीर कोलाप आणि आभार अवनंतिका यांनी मांडले या कार्यक्रमाची प्रास्ताविक माने सर यांनी केलं सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा गाभा आहे सूत्र संचालन चांगल तर सर्व कार्यक्रम चांगला आणि सूत्र संचालन कांबळे साहेब आपल्या मधुर वणीने केलं. या
कार्यक्रमास सर्व संचालक सभासद उपासक आणि उपसीका मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी भोजना नंतर धम्मापाल गाथा होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…