मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- २२ ऑक्टोबर २०२४ रोज मंगळवारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख सतीश धोबे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व सावली (वाघ) गावातील शेतकरी तसेच शिवसैनिक यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यात सावली (वाघ )येथील शासकीय जागेवर गौण खनिज मुरूम व दगड नियमबाहेय उत्खनन मोठया प्रमाणावर सुरू आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील सावली (वाघ) या गावातील शिव सेनीक व शेतकरी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे तक्रार केली आहे की, महसूल विभागाकडून विलास मनोहर देवतळे व इतर काही व्यक्तींना शासकीय जागेवर गौण खनिज (मुरूम दगड) करण्याकरिता जवळजवळ २१ हेक्टर जागेची परवानगी दिली आहे. आमच्या माहिती प्रमाणे त्यांना दिलेली परवानगीची मर्यादा सुध्दा संपली आहे. तरी सुद्धा त्या शासकीय जागेवर पोकलेन, जेसीपी व विस्फोटक पदार्थ वापरून उत्खनन करून परिसरातील ३० ते ३५ फूट खोल गड्डे तयार करून उत्खनन करीत आहे. तसेच त्यांनी दिलेल्या आरक्षित जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यापर्यंत उत्खनन सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यास त्रास होत आहे. तसेच विस्फोटक पदार्थामुळे शेतातील शेतकरी काम करीत असताना त्यांना धोका निर्माण झाला आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विनंती केली की, त्यांनी सदर ठिकाणी विस्फोटक पदार्थ तथा जेसीबी, पोकलेन न वापरता रोज मजुरी लावून उत्खनन करावे, अशी विनंती करण्यात आली. सध्या रब्बी हंगाम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात काम आहे व त्यांना जाणा-यांना रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे सदर विषयाची तात्काळ दखल घेऊन मोका तपासणी करून कारवाई करावी. असे मत शेतकरी व शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना सांगण्यात आले.
निवेदन देताना उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, शकील अहमद, फिरोज खान, आशिष वाघ, दीपक पावडे रामाची किनाके गजानन फरकाडे, राकेश राजुरकर, शकील एकोणकर, दिलीप कुकडे, गजानन धोटे, करण जेनेवार, अजय महाकाळकर, अनिल राजूरकर, निलेश मानकर, योगेश ठग, प्रतीक पावडे, दीपक एकोणकर, संजय एकोणकर, विजय ठग, हनुमान गौळकर, रंजन डोमकावळे, दशरथ तिखट व भास्कर मानकर इत्यादी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…