मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर भर चौकात असलेल्या मोबाईल शॉपी मध्ये चोरट्यांनी चोरी करून लाखोंचे मोबाईल फोन करून नेल्याच्या घटनेने हिंगणघाट शहरात खळबळ माजली आहे. त्यात प्रशासना कडून संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पितळ उघडे पडले आहे.
हिंगणघाट शहरातील लाहोटी ब्रदर या मोबाईल शॉपीमध्ये रात्री उशिरा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचे मोबाईल चोरून नेले. जेव्हा सकाळी दुकान फोडल्याची घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुबा चौकातील लाहोटी मोबाईल शॉपी गाठून तपास सुरू केला. व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे 2.58 वाजता रुबा चौकातील लाहोटी मोबाईल शॉपी समोर एक कार आली आणि काही चेहऱ्यावर मास्क घातलेला व्यक्ती तिथून बाहेर पडला आणि दुकानाचे शटर तोडून आत शिरला आणि दुकानातील अनेक मोबाईल आणि सामान त्याच्या बॅगेत भरले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या दृश्यात चोरट्यांनी मोठ्या हिमतीने आणि धाडसाने हे काम केले. जो शहरातील व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. शहरात अशी घटना प्रथमच घडलेली नाही. या घटनेने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हिंगणघाट पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर असलेल्या या दुकानात घडलेल्या या घटनेने या गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याचेही समोर आले आहे. मशिदीजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळालेल्या फोटोवरून केवळ चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडल्याचे वास्तव समोर आले. मात्र रुबा चौकाजवळील कॅमेरा कार्यान्वित नसल्याने या घटनेचे खरे चित्र दिसत नव्हते.
हाच काय विकास: मोठा गवगवा करत लाखों रुपये खर्च करून हिंगणघाट शहरात ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्या गेले. पण काहीच महिन्यात ते सीसीटीव्ही कॅमेरे पांढरा हत्ती साबित झाले. मागील अनेक दिवसापासून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून आहे याची साधी दाखल उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतीनिधी, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घेतली नाही. विकास कामांचा उदोउदो करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतीनिधीने शोभेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून लाखों रुपये सीसीटीव्ही कॅमेरे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीच्या घस्यात ओतले त्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आणि जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सोडून देण्यात आली.
भर चौकात चोरीमुळे पोलीस प्रशासनावर: हिंगणघाट शहरातील पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर भर चौकात असलेल्या दुकानात चोरी झाल्याने हिंगणघाट पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर आहे की नाही हे दिसून येते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…