मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आर्वीची सीट आपल्या कडे खेचून आणण्यास यश आले आहे.
आर्वी मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण माजी आमदार आणि विद्यमान खासदार अमर काळे यांनी नुसत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून लोकसभेची निवडणूकीत विजय मिळवला. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाकडे खेचून घेतानाच पत्नी मयुरा काळेसाठी उमेदवारी आणण्यात खासदार अमर काळे यशस्वी ठरले आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात वर्धा जिल्ह्यातून मयुरा अमर काळे यांचे नाव आर्वी विधानसभा क्षेत्रातून निश्चित करण्यात आले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवितानाच आर्वी मतदारसंघ पक्षच लढणार, असे स्पष्ट केले होते. ते अखेर खरे ठरले. मयुरा काळे या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या भाची होत. आर्वीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला राहल्याने काँग्रेसने ही जागा सोडू नये, असा आग्रह नेत्यांनी मुंबई व दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत धरला. तशी नावेही सूचविण्यात आली. मात्र छाननी समितीत असलेल्या नावांवर चर्चा न होता अकस्मात पुढे आलेल्या मयुरा काळे यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. तेव्हा इच्छुक असलेले शैलेश अग्रवाल, बाळा जगताप व अनंत मोहोड यांनी आक्षेप घेतले. वरिष्ठांकडे तक्रार केली. खुद्द राहुल गांधी यांनी मयुरा काळे हे एकच नाव काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या यादीत कसे, अशी विचारणा केल्याचे वृत्त उमटले.
आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे परिवाराचे नेहमी वर्चस्व राहिले. त्यामुळे कुटुंबाचा हा बालेकिल्ला सोडण्यास खासदार अमर काळे तयार नव्हते. लोकसभा निवडणुकीत आपण काही अटी ठेवून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारल्याची प्रतिक्रिया त्यांनी तेव्हा दिली होती. त्यात पत्नीसाठी उमेदवारी ही तर अट नव्हती ना, असे विचारले जात आहे. काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादीच आर्वीची जागा लढणार, असा जयंत पाटील यांचा आग्रह असल्याचे त्यावेळी अमर काळे बोलले होते. सहा महिन्यानंतर ते शब्द खरेच ठरले आहेत. एकाच कुटुंबात लोकसभा पाठोपाठ आता विधानसभेतही झेंडा फडकणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…