हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी’ची स्थापना केली असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यातील सदस्यांना अधिकारपत्रे वितरीत करण्यात आली असल्याची माहिती फेडेरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र एफ – टॉमचे अध्यक्ष जगनबाबू गंजी यांनी दिली.
या साहित्य अकादमीत सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक हे शासकीय सदस्य असून सर्वश्री डॉ. पी.व्ही. रमणा यांची कार्याध्यक्षपदी, तर जगनबाबू गंजी ठाणे, अशोक कांटे मुंबई, संगेवानी रवी मुंबई, गुंडेरी श्रीनिवास ठाणे, हरीश केंची पुणे, रविना चव्हाण पुणे, रेणुका बुधारम सोलापूर, गजानन बेजंकीवार यवतमाळ, श्रीनिवास कंदुकुरी बल्लारपुर, सतीश कनकम, चंद्रपूर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती तीन वर्षासाठी गठीत करण्यात आली आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य खात्याचे संचालक सचिन निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी संचालक सचिन निंबाळकर यांनी अकादमी स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. तेलुगू भाषेचे जतन, संवर्धन, प्रसार, प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा. तेलुगू – मराठी भाषिक, साहित्यिक आदान – प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी या हेतूने ‘महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी’ स्थापन करण्यात आलीय. अकादमीच्या वतीने एक लाख रुपयाचा जीवनगौरव पुरस्कार, स्वतंत्र आणि भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य आणि पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी निंबाळकर यांनी दिली. माटुंगा मधल्या म्हैसूर असोसिएशन येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी सुभाष मच्छा, सुभाष बिर्रू आणि इतर तेलुगू बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक जगनबाबू गंजी यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक कांटे यांनी केले.
तेलुगू भाषिकांचा महाराष्ट्राच्या जडण घडणीत खूप मोठा वाटा आहे. मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या आहेत. या संदर्भात मनोहर कदम यांच्या मुंबईच्या जडण घडणीत तेलुगू भाषिकांचा सहभाग या पुस्तकात माहिती नमूद केली आहे. ज्येष्ठ समाज सुधारक महात्मा फुले यांच्यापासून अनेक समाज सुधारकांच्या चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगु भाषिकांचा सहभाग होता. तेलुगू आणि मराठी भाषेचे पुरातन कालपासून सांस्कृतिक संबंध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता मराठीत आणि तेलुगु भाषेमध्ये लिहून साहित्य समृद्ध केलेलं आहे. बालगंधर्वांची सादर केलेली अनेक नाटके तेलुगूत भाषांतर करून सादर केली आहेत. इथला प्रत्येक तेलुगु भाषिक हा तेलुगूभाषेकडे आई आणि मराठीकडे मावशी म्हणून पाहत असतो. ‘माय मरो अन् मावशी उरो….!’ ही मराठी म्हण अक्षरशः जगत असतो. असं भावनिक आवाहन जगनबाबू यांनी केले. तेलुगू मराठी हा परस्पर संबंध ऐतिहासिक काळापासून असल्याची माहितीही जगनबाबू यांनी यावेळी दिली.
तेलुगू अकादमी स्थापन केल्याने महाराष्ट्रातल्या आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषद सारख्या संस्थांची, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण, आदान प्रदान करण्यात ही अकादमी सहाय्यभूत ठरणार आहे. असं सांगून जगनबाबू यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांचे आभार मानले. एफ – टॉम कार्यालयात ठाण्यात मराठी आणि तेलगू भाषेचे वर्ग सुरू असल्याची माहिती अशोक कांटे यांनी यावेळी दिली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…