मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जगभरातील विविध देशात सेवाभाव सर्वोपरी या भावनेने कार्यरत असलेली सामाजिक संस्था लॉयन्स इंटरनॅशनलच्या हिंगणघाट शाखेचा स्थापना व पदग्रहण समारंभ हॉटेल रायगड येथे रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ ला अतिशय उत्साहाने व देखण्या सोहळ्याने संपन्न झाला. यावेळी नवनिर्मित हिंगणघाट लॉयन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध अभियंता सुहास घिनमिने, उपाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. बलराज अवचट, सचिव म्हणून चारुदत्त धात्रक तसेच कोषाध्यक्ष म्हणून शंकर धोंगडे यांनी पदग्रहण केले. यावेळी इंस्टॉलिंग अधिकारी म्हणून लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. रीपल राणे उपस्थित होते. तसेच मुख्य अतिथी डॉ. विनोद अदलखिया (पी.एम.सी.टी. पिडिजी), सुरेन्द्र सिंह (रिजनल चेअरपर्सन), श्रीमती संध्या भगत (झोनल चेअरपर्सन), सुरेन्द्र महाकाळकर (अध्यक्ष, वर्धा लायन्स क्लब), डॉ.कालिंदी राणे (डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी लायन्स क्लब), अरुण चतुर्वेदी, धनंजय ठोंबरे यांची उपस्थिती होती.
मानवता हाच माझा धर्म हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील विविध देशात कार्यरत लॉयन्स क्लबच्या विदर्भातील विविध जिल्हा व शहरात सुरु असलेल्या सेवाभावी कार्याची माहिती डॉ. रिपल राणे यांनी इंस्टॉलींग अधिकारी म्हणून मनोगत व्यक्त करतांना दिली. यावेळी हिंगणघाट लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून इंजिनियर सुहास घिनमिने, सचिव चारुदत्त धात्रक, खजिनदार प्रा. शंकर धोंगडे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. बलराज अवचट यांना पद व कार्याची शपथ दिली.
सोबतच हिंगणघाट लायन्स क्लब कार्यकारी मंडळात राजेश थोरात, डॉ विनोद मुडे, अजय गावंडे, भारत येणोरकर, प्रदीप तपासे, स्नेहल पिसूड्डे, प्रफुल देवतळे योगेश खोडे, मनिष घुडे, विकास सोनकुसरे, योगेश वैरागडे, प्रा. डॉ. शरद विहीरकर, संजय नेहरोत्रा, जगदीश सहारे, प्रा.अनिल तरोटकर, अतुल घुमडे, दिनकर सुरकार, सुनिल सिंगरू, रविंद्र खडतकर, मिलिंद तेलंग, विकास बेले, अनिल बाभळे, मनिष शिरसीकर, डॉ सतीश घुमडे यांना पद व कार्याची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष अभियंता सुहास घिनमिने यांनी आपल्या मनोगतात लॉयन्स क्लब हिंगणघाट विविध मानवतेच्या उपयोगी व पर्यावरण पूरक कार्यात झोकून देऊन व जोमाने कार्य करेल असे उपस्थितांना आश्वासन दिले तसेच सर्व नागरिकांनी व समाजसेवकांनी लॉयन्स क्लबच्या कार्यात तन, मन, धनाने मदत करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन लॉयन अजय गावंडे यांनी केले. लॉयन्स चारुदत्त धात्रक यांनी आभार व्यक्त केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…