मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आर्वी विधानसभा मतदार संघातचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी उमेदवारी न मिळाल्याने आपल्या भाजपा सदस्याचा राजीनामा दिल्याचे सूत्राकडून माहिती समोर आली आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवारिचा तिढा होता. विद्यमान भाजपा आमदार दादाराव केचे व सुमित वानखेडे या दोघांची नाव चर्चेत होती. दरम्यान दादाराव केचे यांनी आज चला उमेदवारी. अर्ज भरायला अशी पोस्ट तयार केली मात्र त्यावर त्याची चिन्ह नसल्याने दादाराव केचे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यात उमेदवार जाहीर झाले असताना आर्वी विधानसभा मतदार संघात दोन चेहरे समोर असल्यामुळे भाजपा ने उमेदवारी जाहीर केली नव्हती. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी शेवटची निवडणूक म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. भाजपाचे युवा नेते सुमित वानखेडे यांनीही आर्वी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मागितली. दोघांपैकी कोण अशी चर्चा सुरू असताना आ. केचे यांनी आज भाजपाचे कमळ चिन्ह टाळून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे केचे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आर्वीत रंगली आहे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…
प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीचा…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती. पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज !…
जिवती पाटण जवळील कलगुडी येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव कार्यक्रम संपन्न.…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज…
अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २९ ऑक्टोंबर:- राज्यात विधानसभा…