डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा: ओपुल तामगाडगे सिताबर्डी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन ! आक्रमण संघटनेचा निषेध.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आचारसंहिता लागू असताना भाजप कार्यकर्त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या मुळे झोन 2 चें डीसीपी मदने सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आक्रमण युवक संघटने च्यावतीने रविवारी निवेदन देण्यात आले.
दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी, भाजपाच्या बड्या नेत्यांचा नामांकन अर्ज दाखल करतांना संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशध्यक्ष आमच्या समाजाचे सुलेखाताई कुंभारे, जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, डॉ.मिलिंद माने, भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, इत्यादी हजारो कार्यकर्त्यांनीं संविधान चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ “जय श्रीराम ” जय श्रीरामाचे नारे लावून संविधान निर्माता डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजात तेढ निर्माण करून दोन समाजामध्ये संघर्ष कसा निर्माण व्हावा याकरिता जाणून-बुजून षडयंत्र रचण्याचे कारस्थान आरएसएस तसेच भाजप च्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. त्यामुळे समाजातील द्वेष, भेदभाव व तेढ निर्माण व्हावी म्हणून असे कृत्य निर्माण करणाऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्वरीत माफी मागावी व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा अभिवादन करून संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करावा, संविधानाचा विजय असावा, अशा प्रकारे त्यां सर्वांनी समाजाची माफी मागावी अन्यथा कलम 228, 352, 398, अनन्वे फिर्याद दाखल करण्यात यावे, याकरिता आक्रमण युवक संघटने तर्फे निवेदन देऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
भाजपा नेत्यावर कारवाई नाही झाली तर अन्यथा दलित बांधव व आमचा समाज रस्त्यावर उतरणार या दरम्यान काही घटना घडतील त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा राहतील. अशा प्रकारे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देते वेळी ओपुल तामगाडगे, उमेदवार दक्षिण पश्चिम विधानसभा व आक्रमण युवक संघटना जिल्हा अध्यक्ष, दीक्षा चौरे जिल्हा संघटक, विशाल बनसोड जिल्हा संघटक, सूरज पुराणिक जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ पत्रकार भागवत लांडगे, प्रमोद खोब्रागडे आणि अनेक संघटेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…