प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या काल आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा या विधानसभा मतदारसंघातून 23 नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.
काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघात माधुरी अरविंद सुरोशे (अपक्ष) एक अर्ज, सचिन युवराज मानमोडे (अपक्ष) एक अर्ज, दादाराव यादवराव केचे (भाजपा) दोन अर्ज व (अपक्ष) एक अर्ज असे एकुण तीन अर्ज, कमलेश धनराज कामडी (अपक्ष) एक अर्ज दाखल केला.
देवळी विधानसभा मतदारसंघात राजेश बकाने (भारतीय जनता पार्टी) यांनी एक अर्ज, निलेश सुभाषराव मसराम (गोंडवाना गणतंत्र पार्टी) एक अर्ज, किरण मारोतराव पारिसे (अपक्ष) एक अर्ज, रणजित प्रतापराव काबंळे (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) चार अर्ज, अश्विनी गोविंद शिरपुरकर (राष्ट्रीय समात पक्ष) एक अर्ज व एक (अपक्ष) असे दोन अर्ज, उमेश महादेवराव म्हैसकार (बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, किरण अरुणराव ठाकरे (अपक्ष) एक अर्ज, चेतन रतनलाल साहू ( सरदार वल्लभभाई पटेल पार्टी) एक अर्ज दाखल केला.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात प्रलय भाऊराव तेलंग (बहुजन समाज पार्टी) दोन अर्ज, मंगला विनोद ठक (अपक्ष) दोन अर्ज, विनोद झामाजी उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) एक अर्ज, मुकेश कमलाकर धोटे (अपक्ष) एक अर्ज दाखल केला.
वर्धा विधानसभा मतदारसंघात रविंद्र नरहरी कोंटबकर (अपक्ष), निखील वसंतराव सातपुते (अपक्ष), विलास दादाराव काबंळे (अपक्ष) दोन अर्ज, डॉ. पंकज राजेश भोयर (भाजपा) तीन अर्ज, समीर सुरेशराव देशमुख (अपक्ष) एक अर्ज व (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) एक अर्ज असे दोन अर्ज, पंकज कृष्णराव बकाने (अपक्ष) एक अर्ज, शेखर प्रमोद शेंडे (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेंस) एक अर्ज दाखल केला. अशा आठ उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले.
दि.25 ऑक्टोबर 2024 रोजी आर्वी विधानसभा मतदार संघात अविनाश बढीये (अपक्ष) एक अर्ज, राजपाल भगत (अपक्ष) एक अर्ज, दिपक मडावी (अपक्ष) दोन अर्ज, देवळी विधानसभा मतदार संघातून राजेश बकाने (भारतीय जनता पार्टी) यांनी एक अर्ज, हिंगणघाट मतदारसंघात उमेश वावरे (अपक्ष) यांनी दोन अर्ज, वर्धा मतदार संघातून रेणुका रविंद्र कोटंबकर (अपक्ष), रविंद्र नरहरी कोंटबकर (अपक्ष), सुधीर पांगुळ (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. अशा आठ उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले होते. दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी हिंगणघाट मतदारसंघात समीर कुणावार (भाजपा) यांनी चार अर्ज व वर्धा विधानसभा मतदारसंघात डॉ. पंकज भोयर (भाजपा ) यांनी एक अर्ज दाखल करण्यात केला. तर दि.23 ऑक्टोंबर 2024 रोजी वर्धा विधानसभा मतदारसंघात निखिल सातपुते (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 29 ऑक्टोबर ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…