प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीचा कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत रेती तस्कर निर्भिड पणे रेती तस्करी करीत आहे. सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल बिघडत असून शासनाचा महसूल बुडत आहे.
परिसरात रेती उत्खनन करून रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच शंकर खरुले मंडळ अधिकारी नागभिड यांच्या नेतृत्वात नागभिडचे ग्राम महसूल अधिकारी सी.जे. चेंनुरवार तसेच तळोधी (बा.) चे ग्राम महसूल अधिकारी अनिल चव्हाण यांना गुप्त माहिती मिळताच दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी मौजा चिखल परसोडी ते नागभीड मार्गावर मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास समीर दुरवास म्हातेरे राह. तोरगाव तह.ब्रम्हपुरी येथील व्यक्तीची विना क्रमांकाची ट्रॅक्टर वाहन अवैध विनापरवाना रेती चोरी करून नागभीड कडे येत असताना पकडण्यात आले.
तसेच पहाटे ३:३० च्या दरम्यान मौजा सावरगाव परिसरात अक्षय संगिडवार राह. पडसगाव तुकुम यांचे विना क्रमांकाची ट्रॅक्टर वाहन विना परवाना अवैधरित्या रेतीची चोरी करून वाहतूक करताना आढळून आल्यामुळे वाहनाचे जप्तीनामा तयार करून वाहन जप्त करण्यात आले. नागभीड महसूल विभागाच्या वतीने सदर कार्यवाही करण्यात आली असून नागभीड तहसील कार्यालय परिसरात संरक्षण भिंत नसल्यामुळे पोलीस स्टेशन तळोधी (बा.) येथे जमा करण्यात आले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…