भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका. मंदिरे, सामाजिक सभागृह यांसह समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध : धनंजय मुंडेंची ग्वाही
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परळी:- सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील रहिवाशांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे, या शहराची व शहरातील लोकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे.
परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज, तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या. समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील, तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधान्याने सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.
कधी म्हणतात परळीत बोगस बूथ आहेत, कधी म्हणतात परळीतल्या लोकांनी बोगस मतदान केले, इथल्या लोकांच्या भावनांचा व आमच्या वरील प्रेमाचा अनादर करून यांना केवळ परळीची बदनामी साधायची आहे अशा लोकांना जनतेने मतदानातूनच धडा शिकवावा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह सुरेश अण्णा टाक, अय्युब पठाण, प्रा.विनोद जगतकर, ऍड.मनजीत सुगरे, दत्ताभाऊ सावंत, चेतन सौंदळे, महेंद्र रोडे, अनिल अष्टेकर, यांच्यासह प्रभाकर हजारे, गोपाळ मामा, सारिका तांदळे, विलास सुगावे, अरुण अर्धापुरे, बाबू काका तांदळे, गवळी समाजातील मुन्ना बागवाले, अरुण चिखले, नितीन बागवाले, मारुती काळे, बापू शिंदे, संभाजी काळे, बंडू बागवाले, सोनाप्पा बागवाले, गोंधळी व रावळ समाजातील जगदीश इगवे, दत्ता दुलदुले, राहुल इगवे, वैजनाथ घोटकर, दीपक सुपले, सचिन मांडे, गणपत इगवे, लिंबाजी ढवळे, रतन मिरगे, नरसिंह मिरगे, गजानन रेणुके यांसह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…