श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- सार्वजनिक बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांना जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यपाल यांच्या दौऱ्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा पंधरा दिवसापूर्वी बीड येथे दौरा झाला. राज्यपाल सारख्या महत्वाच्या व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येतात तेव्हा सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठराविक जबाबदारी असते. राधाकृष्णन हे बीड येथे आले तेव्हा त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. राज्यपाल यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी जी आसन व्यवस्था केली गेली होती त्यात अक्षम्य चुका होत्या.
ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांना कारणे दखावा नोटीस बजावली आहे अशी माहिती महाराष्ट्र संदेश न्युजच्या सूत्रांनी दिली आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…