प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार आहे. यात गुन्हेगार आपल्याला पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडित व्यक्तीला फोन करतात. नंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर अनैतिक कामात सहभागी असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फसवणूक करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडित व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओला लाइक करण्यास सांगून पैसे लुबाडण्याचा सध्या नवा फंडा समोर आला आहे. एका दुकानदाराला त्याचा मोठा फटका बसला आहे. एका दुकानदाराला युट्युबवर काही छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले. त्यामुळे तो खूश झाला. मग त्याला एका टेलिग्राम ग्रूपवर जोडण्यात आले. तिथे त्याला पैसे जमा केले तर त्यावर मोठ्या प्रमाणात कमिशन दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे त्याने 56.7 लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे उसने घेतले. त्यानंतर घोटाळेबाजांनी त्याच्याशी कोणताच संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आपण फसल्याचे त्या दुकानदाराला लक्षात आले.
दरम्यान, अशा प्रकारचे अनेक घोटाळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. ‘डिजिटल अरेस्ट स्कॅम’ हाही त्यापैकीच एक आहे. यात घोटाळा केला असा सांगून ग्राहकांनाच धमकावले जाते, पोलिस अटक करतील अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर शेवटी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते. अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
57 वर्षीय महिला डॉक्टरची जवळपास 7 कोटींची फसवणूक
त्यात मुंबई ‘तुमच्या सिम कार्डचा वापर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात झाला असून, लवकरच तुम्हाला अटक होणार आहे,’ अशी भीती घालून मुंबईतील एका 57 वर्षीय महिला डॉक्टरची जवळपास 7 कोटींना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकून घाबरलेली महिला डॉक्टर किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडतानादेखील सायबर ठगांची परवानगी घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…