जिमलगट्टा येथे आर.सी.एफ.च्या व सि.एस. आर. अंतर्गत जोश फाउंडेशनला वैद्यकीय उपकरणांसाठी मदत; जिमलगट्टा येथे निदान सुविधा उपलब्ध

*कार्यक्रमाचे उदघाटन पंकज तलांडे यांचे हस्ते करण्यात आले आहे*

जिमलगट्टा: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड (आरसीएफ) या देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत सामाजिक आणि आरोग्यसेवेच्या कामात पुढाकार घेत, दि जोश फाउंडेशन, जिमलगट्टा या स्वंयसेवी संस्थेला वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत दिली आहे. या मदतीमुळे दि जोश फाउंडेशनने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल जिमलगट्टा परिसरात नव्याने निदान सुविधा उभारली आहे, ज्यामुळे स्थानिक आदिवासी आणि वंचित लोकांसाठी अत्यावश्यक आरोग्यसेवा दर्जाहीन औषधी उपलब्ध होणार आहे.
दि जोश फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून जिमलगट्टा आणि परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा पुरवत आहे. परंतु निदान सुविधा नसल्यामुळे फाउंडेशनला त्यांची सेवा अधिक व्यापक करण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे स्थानिकांना आरोग्य तपासणीसाठी दूरच्या शहरांपर्यंत जावे लागत होते.आणि गरीब नागरिकांना परवडत नसून आर.सी.एफ.च्या मदतीमुळे आता दि जोश फाउंडेशन कडून अत्याधुनिक निदान उपकरणे खरेदी केली असून आता स्थानिक नागरिकांना आरोग्यसेवेचा दर्जा उंचावला जाणार आहे.
नव्या निदान सुविधेचे उद्घाटन
नवीन निदान सुविधेचे उद्घाटन जिमलगट्टा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज तलांडे यांच्या हस्ते, तसेच उपसरपंचांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य मधुकर कांबळे, श्रीनिवास कुमरे, स्थानिक ग्रामस्थ, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ञ, आणि दि जोश फाउंडेशनच्या इतरसदस्यांची मोठी उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्याच्या वेळी, दि जोश फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. संगीता मेडी यांनी उपस्थित होते. आर.सी.एफ.च्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी खासकरून आर.सी.एफ.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुळगेरिकर, डायरेक्टर(टेक्निकल) श्रीमती रितू गोस्वामी, डायरेक्टर ( फायनान्स) श्रीमती नझत शेख , CSR विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री. मधुकर पाचारने, वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय खामकर, आणि वरिष्ठ व्यवस्थापक श्रीमती हर्षला शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले. “आरसीएफच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे आम्ही आता जिमलगट्टा आणि आसपासच्या परिसरातील आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत निदान आणि आरोग्यसेवा पोहोचवू शकणार आहोत,” असे त्यांनी या वेळी व्यक्त करण्यात आले आहे.

दि जोश फाउंडेशनची उद्दिष्टे
जोश फाउंडेशन ही नफा नसलेली सामाजिक संस्था असून, ती गडचिरोलीसारख्या अति दुर्गम भाग नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, व्यसनमुक्ती, अनाथांची मदत आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत असलेली ही संस्था जिमलगट्टा येथे चॅरिटेबल हॉस्पिटल चालवते. या रुग्णालयाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी आणि गरीब लोकांना अत्यंत कमी दरात वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात.
नवीन निदान सुविधा आणि भविष्याचे ध्येय
आर.सी.एफ.च्या मदतीमुळे दि जोश फाउंडेशनकडे आता आवश्यक निदान उपकरणे उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे रक्ततपासणी सुविधा स्थानिक स्तरावरच मिळणार आहे. या नवीन सुविधा गावातील गरीब, आदिवासी, आणि वंचित लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण यामुळे त्यांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही.
“आमचे ध्येय हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गरीब आणि वंचित व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे आहे,” असे डॉ. संगीता मेडी यांनी सांगितले.
आर.सी.एफ.चे सामाजिक योगदान
आर.सी.एफ. नेहमीच CSR अंतर्गत सामाजिक कामात पुढे असते. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि वंचित समाजघटकांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ झाला आहे. यावेळी, आरसीएफने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय उपकरणांसाठी केलेल्या आर्थिक मदतीमुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे.
अशा प्रकारच्या CSR उपक्रमांमुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सामाजिक दायित्व अधिक प्रभावीपणे समोर येते, आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील विकास साधता येतो.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

7 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

17 hours ago

बीड जिल्यातील परळीत ईव्हीएम मशीन फोडली, 3 बूथवर करण्यात आली तोडफोड.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…

22 hours ago

आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…

1 day ago