हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महायुतीचे उमेदवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून मतदारांना गेलेल्या कॉलची सुरुवात ‘वंदे मातरम् पासून होते. वंदे मातरम् म्हटल्याबरोबर समोरचा व्यक्ती समजून जातो की, की कॉल सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून आहे. या कॉलला प्रतिसादही भरपूर मिळतो आहे. प्रत्यक्ष मतदार आम्ही सुधीरभाऊ यांना निवडून देऊ, आमचा निरोप मुनगंटीवार यांना पोहचवा असा आग्रह करत आहे. याचे कारण मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदार संघाची सेवा केली. समस्या सोडविण्यासाठी जनतेच्या पाठीशी तत्परतेने सोबत असतात. त्यांच्या याच कारणामुळे मतदार राजा संतुष्ट आहे. त्यांच्या लाडक्या नेत्यांच्या ऑफिस मधून फोन आल्यावर आमचे मतदान मुनगंटीवार यांनाच देणार असा विश्वास देत आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांना ‘हॅलो नाही, तर वंदे मातरम् म्हणा..’ हा उपक्रम सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केला. आज त्यांच्या कार्यालयात कुणीही कॉल केला, तर ‘वंदे मातरम्..’ पासून संवादाची सुरूवात होते. यामध्ये देशभक्ती ओतप्रोत भरून असते. लोक संवाद साधतात. त्यांच्या समस्या चुटकी सरशी सुटतात. हा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील जनतेने घेतला आहे. आता निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांना मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून कॉल केले जात आहेत. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. कारण सुधीर मुनगंटीवार यांचे एक वैशीष्ट्य आहे. त्यांना कुणीही कॉल केला तर तो अटेंड केला जातो. त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केला तरीही ते प्रवासात असताना आणि वेळ मिळेल तेव्हा आलेल्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देतात. आज मतदार त्यांना तोच प्रतिसाद देत असल्याचे बघायला मिळते.
मोठे नेते सामान्य लोकांचे कॉल रिसीव्ह करत नाहीत. हा लोकांचा अनुभव आहे. पण सुधीर मुनगंटीवार याला अपवाद आहेत. प्रत्येक व्यक्तीचा कॉल ते घेतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि लोकांची कामे होतात. म्हणून आज त्यांच्या कॉलला लोक प्रतिसाद देत आहेत. असाच कॉल व्हायरल झाले आहेत. त्याची चर्चाही मतदारसंघात आहे. ‘दिला शब्द केला पूर्ण’ ‘विकासपुरूष’ असे नामाभिमानही जनतेने त्यांना दिले आहे. मुनगंटीवार यांनी पहिल्या टप्प्यातच प्रचारात आघाडी घेतली. ही आघाडी ना.मुनगंटीवार कायम ठेवेल, असा विश्वास काही मतदारांनी व्यक्त केला.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…