उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथील सर्वोपचार रुग्णालयात आरोग्य सेवा भगवान भरोसे सुरू असल्याचे चित्र परत एकदा दिसून येत आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसापूर्वी चिखलगाव येथील महादेव तायडे हे रुग्ण पायी चालता चालता पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाता पायाला मार लागला होता, त्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात दाखल करण्यात आले. शिकाऊ डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे व नंतर सिटीस्कॅन करायचा सांगितला. एक्स-रे व सिटी स्कॅन चा रिपोर्ट पाहुन डॉक्टरांनी सदर रुग्णाला मेंदूत रक्ताची गाठ असल्यामुळे नागपूरला पुढील उपचारासाठी न्यावे असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले.
सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना ही माहिती दिली उमेश इंगळे यांनी अपघात कक्ष येऊन सदर एक्स-रे व सिटी स्कॅन चा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवण्यासाठी सांगितला त्यावेळेस शिकाऊ डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टरांना व्हॉट्स ॲप वर सदर रिपोर्ट पाठवला. वरिष्ठ डॉक्टरांनी पण नागपूरला नेण्यासाठी सूचना दिल्या. उमेश इंगळे यांनी डॉक्टरांना चर्चा करून मेंदूत गाठ कुठल्या साईडला आहे, किती मोठी आहे, अशा प्रकारे विचारणा केली असता सदर शिकाऊ डॉक्टरांनी सदर रिपोर्ट परत एक वेळा वरिष्ठ ना पाठवतो आणि सविस्तर विचारतो असे सांगितले तर थोड्यावेळाने सदर शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले की, सदर रुग्ण नॉर्मल असून त्यांना थोडासाच मार लागलेला आहे त्यांना घरी घेऊन जाऊ शकता असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी तुम्ही तर नागपूरला घेऊन जायचे सांगितले होते त्याचं काय अशी विचारणा केली असता सदर शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले की तो रिपोर्ट त्या रुग्णांचा नसून दुसऱ्या रुग्णाचा होता. सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील शिकाऊ डॉक्टरांमुळे अशाप्रकारे चुकीचे रिपोर्ट बघून व व्हाट्सअप द्वारा सूचना देऊन उपचार केले जातात या अगोदरही अशाच प्रकारे चंद्रप्रकाश वानखडे या मुलाला कानाला थोडासा मार होता परंतु या शिकाऊ डॉक्टरांनी त्याला तात्काळ मेंदूला मार आहे असे सांगून नागपूरला पाठवले होते नागपूरला गेल्यानंतर तिथल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला सांगितले की तुला कानाला थोडासा मार आहे डोक्यात कुठल्याही प्रकारचा मार नाही तुम्ही नॉर्मल आहात घरी जाऊ शकता.
अशाप्रकारे अपघात कक्षातील शिकाऊ डॉक्टरांमुळे रुग्णांचा जीवाला धोका निर्माण झाला असून अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्या कडे या विषयी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी अगोदरच तक्रार दिली असून त्यांच्या कडून दुर्लक्ष करण्यात आले.म्हणुन अपघात कक्षात उच्चशिक्षित व प्रशिक्षित डॉक्टर 24 तास उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केली आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…