मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात महा विकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली असून महायुती तर्फे भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार समीर कुणावर यांना परत एकदा उमेदवारी दिली आहे. यात एकूण 12 उमेदवार निवडणुकी रिंगणात असून त्यात मुख्य लढत अतुल वांदिले आणि समिर कुणावर यांच्यात दिसून येत आहे.
हिंगणघाट शहरात मागील अनेक वर्षांपासून कापड गिरण्या होत्या त्यामुळे हिंगणघाट शहराची ओळख ही कामगाराचे शहर म्हणून होती पण आज कापड गिरण्या बंद झाल्याने भक्कास झाले आहे. हजारो कामगार आज बेरोजगार झाले असताना मागील 10 ते 15 वर्षात हिंगणघाट शहरातील बेरोजगारांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांनी रस्त्यावर छोट्या छोट्या टपऱ्या मांडून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत आहे. पण मागील 10 वर्षाच्या काळात या फुटपाथ वर रोजगार करणाऱ्या गरीब कामगार मजूर यांच्या रोजगारावर बुल्टोजर ने घाव टाकण्याचे काम करण्यात आले आणि हजारों नागरिकांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्यात आले.
मागील 10 वर्षात लोकप्रतिनिधी यांनी हिंगणघाट शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न देता जे छोट्या छोट्या टपऱ्या मांडून रोजगार करत आहे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील हजारो बेरोजगार नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुक 2024 मध्ये सत्ताधारी विद्यमान आमदार समीर कुणावर यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
निवडून आले तर अतिक्रमणची कुऱ्हाड चालणार?
महाराष्ट्र संदेश न्युजने हिंगणघाट शहरातील छोट्या छोट्या टपऱ्या लाऊन रोजगार करणाऱ्या मतदाराच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी सांगितलं की, हिंगणघाट शहरात माती गोट्याचा विकास करण्याचा नादात आमच्या रोजगारावर हल्ला करण्यात आला. आमचा विकासाला विरोध नाही पण आमदार समीर कुणावर यांनी रोजगार निर्मिती साठी काहीही केलं नाही त्यामुळे आम्ही स्वतः रोजगार निर्मिती केली. पण मागील 10 वर्षात आमच्या मनात नेहमी भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. कधी नगर पालिकेचा बुल्टजर येऊन आम्हाचा रोजगार बर्बाद करून जाईल.
मेडिकल कॉलेज मुळे आशा होती..
हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होईल आणि शहरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली होती. पण ते जाम येथे गेल्याने हिंगणघाट शहरातून तेल ही गेलं तूप ही गेलं हाती काही नाही लागलं अशी गत झाली आहे. अशी संतापजनक प्रतिक्रिया हिंगणघाट शहरातील रस्त्यांवर छोटी छोटी दुकाने लाऊन रोजगार करणाऱ्या व्यवसायिकांनी महाराष्ट्र संदेश न्युजला दिली आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…