जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे भाजपच्या माजी आमदाराकडून भाजपच्या महिला खासदारांना धमकवलं जात असल्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे .
भारतीय जनता पक्षाची महिला खासदार स्मिता वाघ या महायुती धर्म पाळत अमळनेर मतदा रसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा प्रचार करत आहेत. दरम्यान त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप स्मिता वाघ यांनी जाहीर सभेत केला आहे. निवडणुकांपूर्वीच धमक्यांच्या राजकारणामुळे मात्र अमळनेर मध्ये राष्ट्रीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमळनेर मतदारसंघात भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी हा दावा केला आहे. भाजपच्या माजी व सद्यस्थितीत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जात आहे, असा आरोप खासदार स्मिता वाघ यांनी केला आहे. स्मिता वाघ यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याला जरी धमकावलं जात असलं तरी आपण मेलेल्या आईचे दूध प्यायलेलं नसून धमक्या द्यायच्या असतील तर समोर येऊन धमक्या द्या असं थेट आव्हान खासदार स्मिता वाघ यांनी दिलं आहे. घाबरणार नसल्याचं म्हटलं आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…