_आमगाव येथे महायुतीचे उमेदवार संजयजी पुराम यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत विकासकामांचा आढावा घेत जनतेला मतदानाचे आवाहन

मा.खा.अशोकजी नेते यांचे जाहीर सभेत प्रतिपादन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

दिं. ०८ नोव्हेंबर २०२४

आमगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. संजयजी पुराम यांच्या प्रचारार्थ एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार संजयजी पुराम यांच्या निवडणुकीसाठी आयोजित या सभेत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार आदरणीय अशोकजी नेते यांनी मतदारांना सखोल संबोधन केले.

सभेत बोलताना अशोकजी नेते यांनी आपल्या दहा वर्षांच्या संसदीय कार्यकाळात केलेल्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की, या क्षेत्रातील बहुप्रतिक्षित बरौनी सुपर एक्सप्रेसचा थांबा रेल्वे स्टेशनवर मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला आणि माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेला. यामुळे स्थानिक प्रवाशांना आता अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

यासह,पुढे बोलत आमगाव स्टेशनला अमृत भारत रेल्वे स्टेशन उपक्रमांतर्गत अद्ययावत सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कचारगड या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी त्यांनी सौंदर्यीकरणाचे काम देखील पुढे नेले. लोकसभा कार्यकाळात सुमारे 14,500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिल्याचे सांगितले, ज्यात महामार्ग प्रकल्प, वाहतूक सुविधा, रस्ते विकास हे सर्व केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या सहकार्याने झाले आहेत.

सभेत प्रमुख उपस्थिती असलेले मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवार संजयजी पुराम यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या सभेला केंद्रीय मंत्री श्री. नितिनजी गडकरी, माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार श्री. प्रफुल्लभाई पटेल, विधान परिषद आमदार श्री. परिणयजी फुके, महायुतीचे उमेदवार श्री. संजयजी पुराम, माजी आमदार आणि भाजपा नेते श्री. केशवराव मानकर, विधानसभा संयोजक श्री. विजयजी शिवनकर, माजी आमदार श्री. भैरसिंगजी नागपुरे, लांजी विधानसभा आमदार श्री. राजकुमार कराहे, माजी आमदार श्री. अनिल सोले आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येशुलालजी उपराडे हे मंचावर उपस्थित होते.

सभेत शिवसेनेचे नेते श्री. सुरेंद्रजी नायडु, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी जैन, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. राजुभाऊ पटले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. कमलबापु बहेकर, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. अनिलजी सोनकनवरे, जिल्हा महामंत्री श्री. अखिल येरणे, तसेच जेष्ठ नेते श्री. प्रमोदजी संगीडवार, श्री. झामसिंगजी येरणे, श्री. सुरेश हर्ष, श्री. पिंटु अग्रवाल, श्री. हनुमंत वट्टी, श्री. गुमानसिंग उपराडे, श्री. राजेंद्र गौतम, घनश्यामजी अग्रवाल, कैलासजी तिवारी, सुनंदाताई उईके, कविता रहागंडाले, श्री. प्रशांत कोरै, अंजली बिसेन आणि अनेक महायुतीचे कार्यकर्ते व सन्मानीय पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या समारोपाच्या वेळी, अशोकजी नेते यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली, काँग्रेसने लोकसभेत संविधान पुढे आणुन व महिलांना प्रतिमहिना 8,500 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकली असल्याचा आरोप केला. त्यामुळे मतदारांना जागरूक राहून, खोट्या प्रचारापासून दूर राहून, येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयजी पुराम यांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

महायुतीच्या उमेदवार संजयजी पुराम यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या या सभेत मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विकासाच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

8 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

13 hours ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

17 hours ago

बीड जिल्यातील परळीत ईव्हीएम मशीन फोडली, 3 बूथवर करण्यात आली तोडफोड.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…

23 hours ago

आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…

1 day ago