मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यात विद्यमान आमदार समीर कुणावर यांनी हिंगणघाट – समुद्रपुर – सिंधी रेल्वे विधानसभा मतदार संघात केल्याने विकास कामांच्या जोरावर परत एकदा निवडणुकीला समोर जात आहे. आमदार समीर कुणावर यांच्या कार्यकाळात न भूतो न भविष्य असे विराट विकास कार्य झाल्याचे भाजपा कार्यकर्ते नागरिकांना सांगून त्या विकासाच्या नावावर मत मागत आहेत.
यावेळी आमदार समीर कुणावर यांनी सांगितले की, राजकारणात आलो तेव्हापासून जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. सातत्याने गोरगरीब, सर्वसामान्य व कष्टकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास बाळगला आहे. जात, पात, धर्म न पाहता सेवेचा भाव मनात ठेवून कार्य केले. हिंगणघाट – समुद्रपुर – सिंधी रेल्वे विधानसभा मतदार संघात येणाऱ्या गावातील नागरिकांच्या मागणीनुसार, गावातील विविध विकासकामासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला असून यापुढेही गावाच्या विकासा साठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार समीर कुणावर यांनी दिली.
आमदार समीर कुणावर म्हणाले, ‘सर्वशक्तीने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी उभा आहे. 2 वर्ष 8 महिने महविकास आघाडी सरकारमुळे या मतदार संघातील विकासकामे पूर्णत: थांबली होती. मात्र, महायुतीच्या सरकारमुळे मतदार संघाच्या विकासाला गती मिळाली आहे. येत्या पाच वर्षांत विविध प्रकारच्या विकासकामांतून या मतदार संघाचे नाव महाराष्ट्रात आघाडीवर राहील अशी विकासकामे करण्यात येतील.
हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावाच्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला. तसेच या मतदारसंघातील गरीब कुटुंबाना घरकुल देण्यात आली असून सर्वसामान्यांसाठी नमो आवास योजनेतंर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापुढे लोकसेवेच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार समीर कुणावर म्हणाले.
गरजूंना विविध योजनांचा लाभ: 1 पेक्षा जास्त बहिणींना लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये प्रतिमहा देण्यात येत आहे. 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये देण्यात येत आहे. या मतदारसंघात सिंचन सुविधा, महिला बचत गटासाठी मोठ्या प्रमाणात काम होणार आहे. मतदार संघात शेकडो किलोमीटरचे पाणंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बेला येथे टेक्सटाइल पार्क उद्योग उभा राहिला आहे. उच्च शिक्षणासाठी कॉलेज स्थापना करण्यात आली आहे. पुढे अनेक कंपन्या येणार आहे त्यामुळे येथील तरुणांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराचा प्रश्न देखील सुटणार आहे. असेही समिर कुणावर म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय..
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे. त्यामुळे समुद्रपुर आणि हिंगणघाट तालुक्यातील नागरिकांना उच्च दर्जाचे उपचार मिळण्यात मदत होणार आहे. त्यात विरोधी पक्ष फक्त राजकरण करत असून त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही लक्ष दिसून येत नाही. फक्त आमदार समीर कुणावर यांना विरोध करायचा असे दिसून येत असल्याने ते त्यांना भोवणार आहे असे नागरिक म्हणत आहे.
समीर कुणावर साधणार हट्रिक?:
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने विद्यमान आमदार समीर कुणावर यांना त्याचा लाभ मिळेल असे संकेत मिळून येत आहे. महाविकास आघाडीत आणि बंडखोर उमेदवार यांच्यात मतविभागणी होईल असे चित्र दिसून येते आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत समीर कुणावर साधणार हट्रिक असे चित्र दिसून येत आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…