सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
*पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आदिवासी आणि अनुसूचित जातीतील बंधू-भगिनी अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सहा मूलभूत गरजापासूनही उपेक्षित आहे , त्या सर्वांच्या कल्याणासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी सर्व शक्तीनिशी उभा राहील.’
चेकआष्टा गावातील विविध विकासकामांसाठी तसेच पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार, माता मंदिराचे नूतनीकरण, पाणंद रस्त्याचे डांबरीकरण तसेच सामाजिक सभागृहासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक लावून देण्यात येतील. या गावाच्या विकास कामांसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे ही भावना मनात ठेवून कार्य करण्यात येत आहे. जेवढी कामे या मतदारसंघात तसेच जिल्ह्यात केली महाराष्ट्रात कोणत्याही विधानसभेत इतकी विकासकामे झालेली नाही, याचा अभिमान असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…