मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी असताना बाहेर जिल्हातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू तस्करी करणाऱ्यावर धडक कार्यवाही करत लाखोंचा माल जप्त केला आहे.
दि 12 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे नागपुर ते वर्धा महामार्ग बायपास वरील मॉं कि रसोई रेस्टॉरंट जवळ सापळा रचुन एका पांढ-या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता सदर कारमध्ये एकुण 20 खरर्ड्याचे खोक्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने आरोपी कार चालकास विचारपुस केली असता, सदर दारूचा माल हा त्याने वडगाव जिल्हा नागपुर ग्रामीण येथील साकी बार मधुन अवैधरित्या खरेदी केल्याचे सांगितल्याने.
यावेळी पोलिसांनी जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातुन 1) एक पांढ-या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672, कि. 7,50,000 रू .2) 16 खरर्ड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या 756 सिलबंद शिशा कि. 2,42,100 रू, 3) 3 खरर्ड्याचे खोक्यात 72 सिलबंद बिअरचे डब्बे कि 25,200 रू, 4) 01 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या 100 सिलबंद शिशा कि. 10,000 रू व एक कि-पॅड मोबाईल कि. 2,000 रू असा जु.कि. 10,29,300 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी नामे 1) रवि दिलीप देशमुख, वय 36 वर्ष, रा. गौरी नगर सांवगी मेघे वर्धा, 2) वडगाव जिल्हा नागपुर ग्रामिण येथील साकी बारचा मालक/चालक यांचेवर पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, गजानन दरणे, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके यांनी केली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…