पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक महाघोटाळ्याची घटना समोर आली आहे. येथे एका ठकबाजाने गुंतवलेल्या रकमेची दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आणि जमा रकमेवर 10 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांचे एक कोटी 85 लाख घेऊन आपल्या कुटुंबासह फरार झाल्याचा खळबळजनक घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जुना बगडगंज परिसरातून समोर आली आहे.
या महाघोटाळ्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. सध्या पीडित गुंतवणूकदारांची संख्या साडेतीनशेच्या जवळपास असून ही संख्या अडीच हजारावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किशोर प्रभाकर अमृतकर वय 45 वर्ष रा. जुना बगडगंज असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी किशोर प्रभाकर अमृतकर याने आपल्या घरापासून एक किलमीटर अंतरावर प्रभाव या नावाने जनरल स्टोर्स चालवतो. तो मागील 20 वर्षांपासून तो भीसी आणि आरडी सह अनेक योजना चालवित होता. तो नागरिकांचे पैसे एका वर्षात रक्कम दुप्पट करून देत होता. जमा रकमेवर अतिरिक्त 10 टक्के दराने व्याजही देत होता. दिवाळीत तो गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करीत असल्याने नागरिकांचा विश्वास बसला.
त्यामुळे त्याच्याकडे सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणावर जुळले. गंगाबाई घाट, हिवरीनगर, जगनाडे चौक, श्रीकृष्णनगर, बगडगंज, नंदनवन आदी परिसरातील जवळपास अडीच हजार लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील 20 वर्षांपासून तो वेळेवर रक्कमेसह व्याज परत करीत असल्याने त्याच्यावर कुणालाच संशय नव्हता.
मात्र, या दिवाळीला आरोपी किशोर अमृतकर याने पीडित गुंतवणुकदारांना रक्कम परत केली नाही. ते सर्व त्याच्याकडे तगादा लावत होते. तो त्यांची समजूत घालत होता. अचानक 15 दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह तो फरार झाला. त्याच्या घराला कुलूप लागल्याची माहिती परिसरात पसरली. नागरिकांची प्रचंड गर्दी केली. काही गुंतवणूकदार नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून किशोर विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
कोट्यवधींची रक्कम गुंतवली कुठे?: किशोरला पत्नी आणि एक लहान मुलगा आहे. त्याचे दुमजली घर आहे. तो किराणा दुकान चालवितो. लोकांकडून घेतलेली रक्कम कुठे गुंतवत होता याबद्दल नागरिकांना माहित नाही. मात्र, तो वेळेवर पैसे देत असल्याने लोक त्याच्याकडे जुळत गेले. त्याने कोट्यवधीची रक्कम असल्याने तो एखाद्या संस्थेत किंवा बँक खात्यात जमा करीत असावा अशी शक्यता वर्तविण्यात येते. तसेच शेअर मार्केटमध्ये त्याने पैसा गुंतवला असल्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…