अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमरावती येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांना जोरदार धक्का बसला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील जनतेला पर्याय देण्यासाठी बच्चू कडूंनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात बच्चू कडूं यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या गळाला लागला आहे. बच्चू कडूंना त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात हा मोठा धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवारानेच थेट काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, विदर्भवादी नेते वामनराव चटप यासह समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी राज्यातील विधानसभा निवडणुकांना एकत्रित समोर जात आहे. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभर फिरून प्रचार सभा घेत आहेत.
बच्चू कडूंच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. असं असतानाच अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या मतदार संघात प्रहारने डॉ.सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली होती. ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. असं असताना त्यांनी अचनाक निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवाय त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. अमरावती विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सुनील देशमुख यांचा आपण प्रचार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे.
अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील रहिवासी असलेले डॉ.सय्यद अब्रार हे वरिष्ठ दंत शैल्य चिकित्सक आहेत. या भागात मुस्लीम मतांचे अधिक प्राबल्य आहे. हीच बाब हेरत अब्रार यांनी निवडणूक लढवत असल्याचे घोषित केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. 20 रुपये इतकी कमी रुग्ण तपासणी शुल्क घेऊन ते रुग्णसेवा करतात. त्यामुळे सय्यद अब्रार हे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अब्रार यांच्या या सर्वसामावेशक कामाची नोंद घेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांना अमरावती विधानसभेतून उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच अब्रार यांनी माघार घेतली आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…