महाआघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांची प्रचाराची बल्लारपूर विधानसभा रिंगणात मोटी आघाडी*

सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर

: बल्लारपूर विधानसभा निवडणूक २०२४ एकतर्फी वाटणारे वातावरण आज रोमांचकारी स्थितीत पोहोचले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. पदयात्रा, नुक्कड सभा, कॉर्नर सभा, प्रभात फेरी या माध्यमातून प्रचारात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीला बगल देत सर्व काँग्रेस नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात संतोषसिंह रावत यांना यश आले आहे. आज काँग्रेसचा प्रत्येक नेता आपापल्या तक्रारी विसरून संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे२० नोव्हेंबर ला होणाऱ्या मतदानात सर्व घटकांचा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय पाठिंबा मिळेल आणि ३० वर्षांच्या वनवासातून दिलासा मिळेल, असा विश्वास संतोषसिंह रावत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. २० नोव्हेंबर ला होणाऱ्या मतदानात सर्व घटकांचा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय पाठिंबा मिळेल आणि ३० वर्षांच्या वनवासातून दिलासा मिळेल, असा विश्वास आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टी आणि रिपाई गवई गटानेही पाठिंबा जाहीर केला आहे. बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना त्यांच्या निवडणूक प्रचारात मित्रपक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.  ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजू काबरा, शिवसेना उबाठा गट जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सिक्की यादव आणि आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, ॲड किशोर पुसलवार तसेच आंबेडकरी कार्यकर्ता पवन भगत आणि त्यांचे कार्यकर्ते  हे सर्वजण संतोषसिंह रावत यांचा विजय करीता शक्ती वापरत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील सामंजस्य प्रचार सभेत दिसून येत आहे. तसा सामंजस्य महायुतीतील घटक पक्षांमध्ये दिसत नाही.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

8 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

17 hours ago

बीड जिल्यातील परळीत ईव्हीएम मशीन फोडली, 3 बूथवर करण्यात आली तोडफोड.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…

23 hours ago

आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…

1 day ago