पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुक असल्यामुळे पोलिसांनी सीमा सिल केल्या आहेत त्यामुळे जागोजागी नाकाबंदी करून प्रत्येक गाडी चेक करण्यात येत आहे. त्यात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका कार चालकाने चक्क पोलिसांच्या अंगावर गाडी नेत त्याला फरफटत नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरात एका कारचालकाने नाकाबंदीत कार न थांबविता पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविण्यासाठी धावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला फरफटत नेले. यात कर्मचारी जखमी झाला आहे. याशिवाय कारचालकाने दोन पादचाऱ्यांनादेखील उडविले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू येथे ही घटना रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भगवाघर चौक ते मोमीनपुरा चौकादरम्यान पोलिसांची नाकाबंदी होती. पोलीस कर्मचारी अनिल सहस्त्रबुद्धे वय 40 वर्ष हे कर्तव्यावर होते. मध्यरात्री 1.30 वाजताच्या दरम्यान MH 02 CZ 6221 या क्रमांकाची काळ्या रंगाची कार संशयास्पदरितीने आली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला असता कारचालकाने वेग वाढविला व निघून गेला. त्यानंतर पोलीस सहस्त्रबुद्धे व बिट मार्शल्सने कारचा पाठलाग केला आणि कारला थांबविले. सहस्त्रबुद्धे हे कारच्या मागेच मोटारसायकल लावत असताना कारचालकाने वेगात गाडी रिव्हर्स घेतली. यामुळे कार थेट सहस्त्रबुद्धे यांच्या अंगावर आली. आरोपीने त्यांना फरफटत नेले. यात त्यांच्या पाठ, खांदा व पायाला गंभीर मार लागला. त्यानंतर कारचालकाने पादचारी वहीद खान तसेच मोहम्मद शाहबाज यांना धडक दिली. तसेच तीन ते चार मोटारसायकल, एका घराची पायरी व रेलिंगलादेखील धडक दिली.
त्यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून एका गल्लीत कारला अखेर अडविले. पोलिसांनी कारचालक संकेत दिलीप कन्हेरे वय 23 वर्ष रा. अष्टविनायक अपार्टमेंट, लुंबिनी नगर, मानकापूर, राहुल प्रेमलाल राऊत वय 32 वर्ष राह. लुंबिनी बुद्धविहाराजवळ, खापरखेडा व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर सोहेल खान वय 25 वर्ष मानकापूर हा पळून जाण्यात यशस्वी झाला. जखमींना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे घटनास्थळी खळबळ उडाली होती. सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला पालकांच्या हवाली करण्यात आले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…