मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपुर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार समिर कुणावर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल वांदिले यांच्यात थेट लढत आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार समिर कुणावर विजयश्री खेचून आणली. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने यांनी राजू तीमांडे यांचा पराभव केला होता. पण 2024 मध्ये राजू तीमांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात आहे. पण हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल वांदिले यांच्यात थेट लढत आहे.
2024 विधानसभा निवडणुकीत यावेळी राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आमदार समीर कुणावर यांच्यासमोर युवा नेते असलेले अतुल वांदिले यांचे कडवे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशावरून शिवसेना (उबाठा) काँग्रेस कडून वांदिले यांना पूर्ण मदत मिळते आहे. विद्यमान आमदार समीर कुणावर यांच्या दहा वर्षांतील कामगिरीबाबत जनतेत काही प्रमाणात समाधानी दिसून येत असली तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहराच्या बाहेर गेल्याने हिंगणघाट शहरातून मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. दलित आणि मुस्लीम मतांचे गणित जुळवण्यात भाजपा महायुतीचे नियोजन पूर्णपणे चुकल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
निर्णायक ठरणार तो शेतकरी? हिंगणघाट समुद्रपुर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदार हे ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर मतदार हे निर्णायक ठरणार आहे. शेतकऱ्याचा आशीर्वाद ज्यांना मिळणार तोच विजय होणार आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात तेली समाज आणि कुंभी समाजाचे वर्चस्व आहे. त्यात दलित आणि मुस्लीम मतदार हे विजयासाठी निर्णायक ठरतात त्यामुळे त्यांना आपल्याकडे खेचण्यात महा विकास आघाडीचे अतुल वांदिले आणि महायुतीचे समिर कुणावर याचा आटापिटा सुरू आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आमदार समीर कुणावर यांना सर्व समाजाचे मतदान झाल्याचे दिसते. पण या निवडणुकीत भाजपाच्या वतीने जातीय आधारावर हिंदू विरुध्द मुस्लिम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून “बटोंगे तो कटोंगे” सारख्या घोषणा देण्यात येत आहे. त्यामुळे पण मुस्लिम आणि दलित मते आमदार समीर कुणावर यांच्या विरोधात जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
त्यात महाविकास आघाडीचे नेते हे संविधान बचाव म्हणून या निवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. त्यात तेली समाज अतुल वांदिले यांच्या पाठीशी दिसून येत आहे. त्यात मुस्लिम आणि दलित समाज पण वांदिले यांच्या सोबत जाणार असे जाणकार म्हणतात.
विद्यमान आमदार समीर कुणावर यांना भाजपची सत्ता असतानाही आजनसरा ब्रारेज प्रकल्प, रोजगार निर्मिती, हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अगोदर विरोध, जेव्हा नागरिकांनी आंदोलन केले तेव्हा जनाधार विरोधात जात आहे असे दिसून आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू केला आणि ते हिंगणघाट ऐवजी जामला घेऊन गेले. पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा येथील खाजगी कंपनीच्या जागेवर होण्याला काही नेत्यांनी विरोध केल्याने ते महाविद्यालय हिंगणघाट येथे न होऊ देऊन ते जाम येते जानबुजून नेण्यात आले असा मतप्रवाह येथे आहे. यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण आणि विकासकामे हेच महत्त्वाचे मुद्दे ठरतील, असे सध्याचे चित्र आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…