नागपूर मध्ये वाहतूक पोलिसानचा संतापजनक प्रकार दुचाकी सह दुचाकीस्वारला क्रेनने हवेत उचलले व्हिडिओ वायरल.

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:-
शहरात वाहतूक सुरक्षित राहावी व वाहतूक कोंडी नाही व्हावावी म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच सक्रीय असतात. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करन्यात आले. नागरिकांना वाहतूक शिस्त लागावी हा त्यामागचा हेतू असतो. तसेच, रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांवरही वाहतूक विभाग कारवाई करतो. ही कारवाई करन्यासाठी काही खाजगी कंत्राटदार कंपन्यांनाही हे काम दिले जाते. ते नियमबाह्य पद्धतीने उभ्या केलेली वाहने उचलात. पण ही कारवाई करताना कधी कधी अधिक अमानूषपणे वर्तन केले जाते. अशाच प्रकारचे वर्तन नागपूर पोलीसांच्या वाहतूक विभागाकडून झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात वाहतूक पोलीस या घटनेत थेट सहभागी नसले तरी ज्या कंत्राटी कंपनीने हे कृत्य केले आहे. दुचाकीस्वाराला बाईकसह टोचण लाऊन उचलले आहे. याबाबतचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात दुचाकीस्वार क्रेनच्या दोरीला हवेत लटकताना दिसतो आहे.

ही संतापजनक घटना नागपूर शहरातील अंजुमन कॉम्प्लेक्स परिसरातील आहे. प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीने आपली दुचाकी नो पार्किंग असलेल्या ठिकाणी लावली होती. त्यामुळे कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळी कारवाईसाठी आले. वाहने उचलण्यासाठी ते हायड्रॉलिक क्रेन सोबतच घेऊन आले होते. कारवाईला सुरुवात होताच दुचाकीचा मालक घटनास्थळी आला. त्याने आपण गाडी बाजूला घेत आहोत. कारवाई करु नका म्हणत गाडी बाजूला घेण्यास सुरुवात केली. तो आपल्या दुचाकीवरही बसला. पण, मुजोर कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीसह दुचाकी क्रेनने उचलली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला.

वाहतूक पोलिसांकडे असलेल्या कंत्राटी कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्यांविरुद्ध परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिक विभागाकडून कंपनीवर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

11 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

11 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

12 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

12 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago