✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- आज शेतकऱ्याच्या शेती पिकवण्यासाठी खर्च वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हिंगणघाटच्या राम कावळे या विद्यार्थ्यान शेतीउपयोगी फवारणीसाठी बनवलेला ड्रोन सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. राम कावळे याने समुद्रपुरच्या विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालयात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक कोर्स केला. यातून त्याला टेक्नॉलॉजीच ज्ञान मिळालं.
याच ज्ञानाचा उपयोग करून त्यान महाविद्यालयात बिए.च शिक्षण घेताना ड्रोन बनवला आहे. लग्नसमारंभात वापरल्या जाणारे ड्रोन पाहून त्यानं स्वतःही ड्रोन तयार करण्याचा संकल्प केला. घरी टेक्नॉलॉजीचा फारसा कुणाला गंध नसताना त्यानं स्वतःच अभ्यास करुन शेतात फवारणी उपयोगी ठरणारा ड्रोन बनवला.
सर्वसाधारण कुटुंबातील राम कावळे यान आजोबाच्या व नातेवाईकाच्या मदतीन सुटे भाग बोलावून हा ड्रोन तयार केला आहे. दहा लीटर क्षमतेची टाकी असून शेताच्या चारही बाजूंची कमांड दिल्यावर हा ड्रोन अवघ्या पंधरा ते विस मिनिटात एक एकर फवारणी करतो. हा ड्रोन तयार करण्यास जवळपास चार लाख रुपये खर्च आला.
सुटेभाग लवकर उपलब्ध झाल्यास लवकर ड्रोन तयार करू शकतो. या ड्रोनची किंमत कमी असल्याच तो सांगतो.आणखी कमी किंमतीत ड्रोन तयार करण्यासोबतच त्यात आणखी संशोधन करत असल्याचं रामने सांगितले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…