अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात चोरीचे सत्र सुरूच शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून चोर पोलिसांना गवसत नसल्याने चोरीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात शहरात सीसीटीव्ही कॅमेरे तर लावले असून ते शोभेचे बाहुले बनले असल्याने नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हिंगणघाट शहराच्या बस स्टॅन्ड जवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट लगतच्या अरुण बुट हाऊस मध्ये चोरी करून लाखोचा माल चोरांनी लंपास केला आहे. रात्रीच्या सुमारास चोरांनी बूट हाऊस दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत या चोरीच्या घटनेला अंजाम दिला.
सकाळी बूट हाऊस मालक हांडे हे आपले दुकान खोलण्याकरिता नेहमीप्रमाणे आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याची शंका झाली तेव्हा त्यांनी पाहणी केली असता दुकानात अनेक मालाची फेकाफेक केलेली दिसली व काही दुकानातील माल चोरांनी पळवून नेल्याचे दिसून आले. या संदर्भात दुकान मालक हांडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी जाऊन तपासणी केली. संबंधित घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
ही चोरीची घटना रात्रीच्या सुमारास झाली असल्याची शक्यता असून चोरांनी बुट हाऊस मधून लाखोच्या मालाची चोरी केली आहे. काहीच दिवसा अगोदर हिंगणघाट शहरातील रुबा चौक येथे लाहोटी यांच्या मोबाईल दुकानात पण चोरी झाली होती. आता चप्पल जूतेच्या दुकानात चोरी झाल्याने हे चोरीचे सत्र सुरूच असल्याची चर्चा सुरू आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…