बालविवाह मुक्त भारत करीता विद्यार्थ्यानी घेतली शपथ. राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, स्काउट्स – गाईड्स चा उपक्रम.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 28:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे बालविवाह मुक्त भारत अभियनांतर्गत उपस्थीत विद्यार्थि, पालक, शिक्षकांनी शपथ घेतली. यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमूख, स्काऊट मास्तर बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिट व इतरही विध्यार्थीनी बालविवाह मुक्त भारत करण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली. यावेळी आदर्श प्राथमिक चे शिक्षक रुपेश चिडे, रोशनी कांबळे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, माधुरी रणदिवे, वैशाली चीमुरकर, मनीषा लोढे, पूजा इटनकर, आदर्श हायस्कूलचे शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब तसेच स्काउट्स – गाईडच्या माध्यमातून या बालविवाह मुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाधिाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा शंभर टक्के बालविवाह मुक्त करू असा विश्वास व्यक्त करीत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकताच या अभियानाचा शुभारंभ केला आहे. आदर्श शाळेने यापूर्वी ही शासन स्तरावरील तसेच जिल्हा परीषद, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक विभाग तसेच स्काउट्स – गाईड्स, सामजिक वनीकरण व वनविभाग यांच्या निर्देशानुसार अनेक उपक्रम, कार्यक्रमात सक्रिय सहभाग दर्शविला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश चिडे यांनी केले. तर प्रास्ताविक नलिनी पिंगे यांनी केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…