राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होऊन एक आठवडा झाला त्यात राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला बंपर बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे महायुतीत दिसते तितकं बर नाही अशी चर्चा रंगली आहे. त्यात समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.
त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाला किती मंत्रिपदं?
समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी रवाना झाले आहेत. पुढील 2 दिवस महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीयेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसले आहेत. गृहखातं मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. अन्यथा उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेथील एखाद्या दुसऱ्या वरिष्ट नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप देखील गृहखात्यासाठी अग्रही आहे, भाजप देखील गृहखातं सोडण्यास तयार नाही, त्यामुळे अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळणार का? नाही मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुतीला मिळाले स्पष्ट बहुमत:
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 132 जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला 8 अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं मानलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे, मात्र ते गृहमंत्रिपदासाठी अडून बसल्याची माहिती आता समोर येत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…