अध्यक्ष पदी सचिन मेश्राम, उपाध्यक्ष पदी अमोल कुमरे, सचिव कैलास ठेंगणे तर कार्याध्यक्ष दिपक डोहणे यांनी नियुक्ती.
नितेश पत्रकार, तालुका प्रतिनिधी वणी
मो. न,7620029220
मारेगाव: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची मारेगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी अनंतराव गोवर्धन, मारेगाव तालुका अध्यक्षपदी सचिन मेश्राम तर सचिवपदी कैलास ठेंगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मारेगाव येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे, मौनोद्दीन सौदागर, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, कार्याध्यक्ष दिपक डोहणे, सचिव कैलास ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे,पंकज नेहारे, कैलास मेश्राम, कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिध्दी प्रमुख संतोष बहादूरे, रोहन आदेवार, विवेक तोडासे, राजू पिपराडे, सुदर्शन टेकाम आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
पत्रकार व कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारिता करित असताना पत्रकारांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे तर आभार अनंतरावं गोवर्धन यांनी मानले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…