विध्यार्थी साखळीच्या माध्यमातुन पहिला अपार आयडी केला प्रदर्शित. “वन नेशन, वन स्टुडंट् आयडी “कार्यक्रमात आदर्श शाळेचा सहभाग.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 29 नोव्हेंबर:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा तथा आदर्श हायस्कूल राजुरा शाळेत सर्व विद्यार्थांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशनुसार “अपार दिवस” साजरा करण्यात आला.
राज्यांतील सर्व विद्यार्थ्याना अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. दि. २५ नोव्हेंबर २०२४ राज्यांतील ६५ लाख (३१%) विद्यार्थ्याना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्याना अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यांतील सर्व विद्यार्थ्याना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक २९ व ३० नोव्हेंबर ला राज्यांतील सर्व शाळेमध्ये अपार दिवस साजरा करण्याचे आदेश देण्यात आलें. त्यानुसार आदर्श शाळेत बादल बेले, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख तथा स्काउट्स मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली अपार दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विशेष मोहिमेअंतर्गत शाळेतील इयत्ता पहिली व दहावीतील सर्वात पहिले अपार आयडी तयार झालेल्या विद्यार्थिनींना भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच विध्यार्थी व उपस्थीत पालकांना अपार आयडी चे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विध्यार्थी साखळी तयार करून पहिला अपार आयडी प्रदर्शित करुन इतरांनीही अपार आयडी तयार करावा याकरीता प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार, शिक्षक रुपेश चिडे, रोशनी कांबळे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, माधुरी रणदिवे, वैशाली चीमुरकर , मनीषा लोढे , पूजा इटनकर, आदर्श हायस्कूल चे शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींची उपस्थिती होती. स्काउट्स मास्तर रूपेश चिडे यांनी यावेळी अपार आयडी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच उपस्थीत सर्वच शिक्षकांनी विद्यार्थांचे अपार आयडी तयार केले.
अपार म्हणजे काय: ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री असा त्याचा पुर्ण अर्थ आहे. ही भारतातील सर्व विद्यार्थांना डिझाईन केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे. हा उपक्रम २०२० च्या नविन राष्ट्रीय शैक्षणीक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने सुरू केलेल्या ” वन नेशन, वन स्टुडंट्स आयडी” कार्यक्रमाचा एक भाग आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…