✒️मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
गडचिरोली:- सणासूधीचे दिवस असून शहरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो परंतु शहरभर जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याने नागरिकांना मानसिक मनस्त:प सहन करावे लागत आहे नगर परिषद प्रशासनाला तुडूंब भरलेल्या नाल्याचा उपसा करून घाण साफ करायला वांरवांर सांगून सुद्धा मुजोर प्रशासन ऐकत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाल्या उपसा मोहिम गोकुलनगरात राबविण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे बाशिद शेख यांच्या पुढाकाराने रोजंदारीचे मजुर करून गोकुलनगरातील नाल्या दिवसभर साफ करण्यात आल्या, यावेळी दिशानिर्देश देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे,महासचिव योगेंद्र बांगरे, बाशिद शेख उपस्थित होते, तर शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, संघटक भारत रायपूरे, महासचिव सोनलदिप देवतळे, मनिषा वाळके जावेद शेख, भोजराज रामटेके, मनोहर कुळमेथे, आबिद शेख, क्रिष्णा शेंडे यांच्या नेतृत्वात नाल्या साफ करा मोहिम राबविण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी नगर परिषद प्रशासनाचा निषेध करून नगर परिषद प्रशासन मुर्दाबादचे नारे लावण्यात आले, २८ सप्टेंबर रोजी नगर परिषदेला लॉक करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी सांगितले. या उपक्रमात वंचित बहुजन आघाडीचे गोकुल नगरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…