मानवेल शेळके अहिल्यानगर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन नगर:- राज्यात विधानसभा निवडणुक संपन्न होऊन 13 दिवस झाले असले तरी ईव्हीएम बाबत अनेक मतदार आणि नागरिकात संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आकडेवारी वरून पण विरोधी पक्ष वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करत आहे. त्यात राज्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधी आंदोलन राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईव्हीएमवर संशयाचे वातावरण निर्माण झालेले असताना, पुणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ईव्हीएम विरोधातील आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, शहर महासचिव अमर निर्भवणे, जिल्हा संघटक प्रसाद भिवसने, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, गणेश राऊत, बबलू भिंगारदिवे, आसिफ शेख, नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, श्रीगोंदा अध्यक्ष संतोष जवंजाळ, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे त्याचबरोबर सर्व जिल्हा, तालुका, शहर आणि युवा पदाधिकारी ही मोहीम आपापल्या विभागात राबवणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहर आणि उपनगर येथे…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…