मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन हिंगणघाट:- पतित पावन मार्गशीर्ष अमावस्येच्या पावन पर्वावर नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट व अखिल भारतीय मारवाडी युवा मंच एलिट लेडीज विंगच्या संयुक्त विद्यमाने कुडकुडत्या थंडीपासून बचाव करण्याकरता गरीब गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
स्थानिक जलाराम मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मित्रपरिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल होते. तसेच अशोक आकडे, उपाध्यक्ष विविध टेक्सटाईल जाम, डॉ. रमेश राका, महेश दीक्षित, सेवानिवृत्त मुख्याधिकारी, अशोक मिहानी संचालक स्वाद चहा, आशिष जाना संचालक इरा अर्बन बँक, प्रा.किरण वैद्य अध्यक्ष पत्रकार संघ हिंगणघाट, अपर्णा मरोठी अध्यक्ष मारवाडी युवा मंच एलिट लेडीज विंग, डॉ. रुपाल कोठारी अध्यक्ष इनरव्हील क्लब, प्रा. लतिका बेलेकर, श्रीमती किरण मुनोत, डॉ. दिपाली बोंडे, डॉ. प्रणाली सायंकार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू व दुर्बलांना ब्लॅंकेट, गरम टोपी व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मित्र परिवाराचे अध्यक्ष अग्रवाल म्हणाले की, समाजात जे पीडित वंचित घटक आहेत, त्यांचे जीवनातील दुःख पीडा दूर करण्यासाठी केलेले सेवा कार्य हे खऱ्या अर्थाने जीवनातील वास्तविक सुख आहे. मानवसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा असून यातून व्यक्तीला आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे समाजातील सेवाभावी व्यक्तींनी अशा सामाजिक कार्यात हातभार लावून दुर्बल घटकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन सचिव पराग मुडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अंकिता मुंधडा यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नारायण सेवा मित्रपरिवार व अखिल भारतीय मारवाडी युवा मंच एलिट लेडीज विंग चे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…