संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6 डिसेंबर:- राजुरा येथील प्रतिष्ठित नागरिक नवरतन गोठी यांची धर्मपत्नी रंभादेवी गोठी यांच दिनांक 2 डिसेंबर 2024 ला दुःखद निधन झालं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमा अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय राजुरा येथे गोठी मेडिकल राजुराचे संचालक प्रशांत गोठी यांच्या शुभहस्ते पिंपळ व वड वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
देशात आणि जगात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविला जात आहे. या प्रसंगी डॉ. सुचिता धांडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राजुरा, डॉ. नरसिंग तेलंगे पशुधन विकास अधिकारी राजुरा, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा श्रेया परळपगार, पशुधन पर्यवेक्षक अलंकार तामगाडगे, परिचर दिव्या प्रशांत गोठी, दिनबंधू परिवार राजुराचे जेष्ट सदस्य रत्नाकर वनकर व वृक्षप्रेमी भास्कर करमनकर, राजुरा तालुका संघटक नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सुचिता धांडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राजुरा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच नियमितपने वृक्षारोपण करीत असल्यामुळे त्यांनी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका संघटक वृक्षप्रेमी भास्कर करमनकर यांचं अभिनंदन केले.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…