मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर आम्ही आमच्या हजारो सहकाऱ्यासोबत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे सर्वोच्च नेते शरदचंद्र पवार यांना सादर केल्यानंतरही केवळ जिल्हाध्यक्ष यांच्या एकतर्फी अहवाला वरून आम्हाला निलंबित करण्याची कारवाई ही पूर्णतः असंवैधानिक आहे असे स्पष्ट मत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहकार नेते ॲड. सुधीर कोठारी व माजी आमदार राजू तिमांडे यांनी आज एका पत्रपरीषदेतून व्यक्त केले.
या पत्र परिषदेला या दोघांही नेत्यांनी दि 4 नोव्हेंबरला पक्षा कडे पाठविलेल्या राजीनाम्याची प्रत सादर केली. आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी आम्ही मेळावा घेऊन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षत्याग केलेला असतांना व त्यांची माहिती पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना असतांना पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने कोणतीही माहिती न घेतल्याने त्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आलेली आहे असा टोला त्यांनी यावेळी मारला.
यावेळी त्यांनी पक्ष स्थापनेपासूनच्या सविस्तर घडामोडीची माहिती दिली. पक्षाच्या स्थापने पासून आम्ही निष्टेने पक्ष वाढविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. याचमुळे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्था व ग्राम पंचायत सरपंच तसेच भाजपच्या तावडीतून हिंगणघाट नगर पालिका व समुद्रपूर नगर पंचायत हिसकावून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवीला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात केवळ हिंगणघाट मतदार संघातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे कार्य आम्ही केल्याचे उभय नेत्यांनी स्पष्ट केले. परंतु जिल्हाध्यक्ष राऊत यांनी मनसे सोडून दोन वर्षा पूर्वी पक्षात आलेल्या एका युवकाला पक्षात स्थान देऊन त्याच्या तालावर पक्ष चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील दोन वर्षात पक्षात या जिल्ह्यात काय सुरु आहे याची सविस्तर माहिती वेळोवेळी पक्षाच्या नेतृत्वाला दिली होती. परंतु त्यांची कोणतीही दखल न घेता जिल्हाध्यक्षाच्या मतानुसार पक्षाची वाटचाल सुरु होती. उमेदवारी देतांना आम्हाला विचारात न घेता नवखा उमेदवार मतदार संघावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिल्लक असलेल्या पक्षातील राज्यस्तरीय नेतृत्वाच्या अपरिपक्व धोरणामुळे आज महाराष्ट्रात केवळ 10 जागा मिळाल्या तर विदर्भात भोपळा ही फोडता आला नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी व हिंगणघाट ह्या दोन्ही ठिकाणी पक्षाला प्रचंड मतांनी पराभव स्विकारावा लागला हें वास्तव दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील राजकीय वाटचाली संदर्भात या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की आम्हाला अनेक पक्षा कडून ऑफर येत असून योग्य वेळी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा यावर निर्णय घेण्यात येईल असे ॲड. सुधीर कोठारी व राजु तिमांडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी समुद्रपूर बाजार समितीचे अध्यक्ष हिम्मत चतुर, हिगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीष वडतकर, कामगार नेते आफताब खान, दिगंबर चांभारे, सुनील काळे, नरेंद्र थोरात, तेजस तडस, निखिल वदनलवर, संजय चौव्हान, गौरव तिमांडे, नकुल भाईमारे उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…