रात्री उशिरा नराधम सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा केला दाखल.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संपूर्ण नागपूरला हादरविणारी घटना समोर आली आहे. येथे नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका नराधम पोलीस उपनिरीक्षकाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तो नराधम सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक इतक्यावरच न थांबता पिढीत मुलीशी शारीरिक संबंध बनवताना व्हिडीओ बनवला. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे.
त्यानंतर पिढीत मुलीला धमकावून परत शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकला. पण पिढीत मुलीने संबंध बनविण्यासाठी नकार दिल्यामुळे या 14 वर्षीय मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती कुटुंबांना मिळताच मुलीच्या कुटुंबियांनी गिट्टीखदान पोलिस स्टेशन मध्ये नराधम पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. यावी पोलिसांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कवडू धुर्वे असे आरोपी पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन पिढीत मुलगी आपल्या आई वडिलांसह राहते. ती 8 वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्याच वस्तीत नराधम आरोपी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक कवडू धुर्वे हा पण राहतो. तो शहर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागातून सेवानिवृत्त झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांशी त्याची मैत्री होती. त्यामुळे तो नेहमी घरी येत होती. त्याची नजर मुलीवर पडली. घरी कुणी नसताना त्याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मुलीशी अश्लील चाळे केले. आईवडिलांना न सांगण्याची धमकी मुलीला दिली होती. मुलीने कुटुंबियांकडे तक्रार न केल्यामुळे पीएसआयची हिम्मत वाढली. त्याने पुन्हा त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे भ्रमणध्वनीने चित्रिकरण केले. तेव्हापासून तो नेहमी तिला अश्लीच चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन गेल्या अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करीत होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती मुलगी त्याच्यापासून दुरावा ठेवत होती. त्याने तिला अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी दिली. तरीही त्या मुलीने हिम्मत एकवटून त्याला विरोध केला. त्यामुळे त्याने वस्तीतील एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती पोस्ट केल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी या प्रकाराची मुलीच्या वडिलांना माहिती दिली. मुलीचे कुटुंबिय थेट गिट्टीखदान पोलीस स्टेशन मध्ये पोहचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरुन पोलीस उपनिरीक्षक कवडू धुर्वे याच्यावर बलात्कारासह आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले.
गुन्हा दाखल करण्यास उशिर नागरिकांमध्ये रोष: पिढीत मुलगी ज्या परिसरात राहते त्या परिसरातील अनेक नागरिकांनी पिढीत मुलीच्या अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर बघितल्या. त्यामुळे नराधम पोलीस अधिकाऱ्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. अनेकांनी पीएसआयला जाब विचारला. मात्र, नागरिकांना दमदाटी करीत होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांसह परिसरातील जवळपास शेकडो नागरिक गिट्टीखदान पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशिर लावल्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता. मात्र, रात्री उशिरा त्या पीएसआयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…