“पर्याप्त शिक्षक नाही, शिक्षणाचा दर्जा नाही मग पटसंख्या वाढणार कशी?” स्थानिक आमदार तसेच मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष का?
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- नगरपरिषद शाळांमधील शिक्षकांची संख्या वाढावी, शैक्षणिक दर्जेत सुधार व्हावा, सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना शाळेतून मिळावे या मागण्यांना घेऊन गत काही वर्षांपासून आम आदमी पक्ष नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर दबाव तयार करित आहे. आता या प्रश्नावर पक्षाने थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे.
सात वेळा निवडून आलेले स्थानिक आमदार स्वतःच्या मोठ मोठ्या विकास कामांबाबत ओळखले जातात मग गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत व नगरपरिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जेबाबत आमदार साहेबांना चिंता का नाही? शिक्षक संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्न का करित नाही? असा सवाल उपस्थित करित शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने आज पुन्हा मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन शाळांमधील स्थितीबाबत पुन्हा शाळांचे निरिक्षण दौरा करण्याची पूर्व सूचना देण्यात आली.
कारण पक्षाला पालकांकडून वारंवार शाळांच्या शिक्षण स्थितीबाबत तक्रारी मिळत आहेत. यावेळेस पक्षाने आमदार आणि मुख्याधिकारी जाणून बुजून शाळांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करित असल्याचे आरोप देखील केले. शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी माहिती दिली की मुख्याधिकारी शाळांचे निरिक्षण दौरा करू देत नाही आहे. यावेळेस शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, प्रवाक्ता आसिफ शेख, महीला अध्यक्षा किरण खन्ना, महीला उपाध्यक्षा मनीषा अकोले, सलमा सिद्दिकी, रेणुका गायकवाड, गणेश अकोले, सम्यक व इत्यादी उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…