उषा कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक लढा देण्यासाठी कायम पुढे असणारे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आंदोलन पश्चिम महाराष्ट्र उपकार्याध्यक्ष आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख कामगार नेते, संजय भूपाल कांबळे यांची केलेल्या विधायक कार्याची दखल घेऊन, त्यांना दिनांक ३ जानेवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, रविवार दिनांक 08 डिसेंबर रोजी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार विजेते नामदेवराव कांबळे कास्ट्राईब नेते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आकाश तांबे अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य, प्रा. बाजीराव प्रज्ञावंत (वरिष्ठ उपाध्यक्ष), रविंद्र पालवे (सरचिटणीस), विष्णू माने (माजी नगरसेवक), अनिता प्रज्ञावंत, संगिता कांबळे, अवंतीका वाघमारे, मंगल कांबळे, अनिल मोरे, युवराज कांबळे, संदिप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘माळी मंगल कार्यालय’ विश्रामबाग, लक्ष्मी मंदिर जवळ कुपवाड रोड सांगली या ठिकाणी, कास्ट्राईब नेते नामदेव कांबळे यांच्या हस्ते कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीने ‘क्रांतीज्योती महात्मा फुले समाज गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद काकडे यांनी व त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी उत्कृष्ट पध्दतीने केले. या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना सर्व सदस्य शिक्षक बंधु आणि भगिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते संजय कांबळे यांना ‘क्रांतीज्योती महात्मा फुले समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अशीच उत्तरोत्तर संजय कांबळे यांना सामाजिक कार्यात यश मिळो याकरिता प्रशांत वाघमारे राज्य प्रदेश उपसचिव भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य तथा पश्चिम महाराष्ट्र महासचिव वंचित बहुजन माथाडी टान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…