आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नुसत्याच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उमरी मेघे येथील बूथवर महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक नितेश कराळे मास्तर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच नितेश कराळे फरार झाले होते. ते अंतरिम जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मांडवा येथून मतदान करून नितेश कराळे परतत असताना उमरी मेघे गावात थांबले. तेथील बुथवर एका महिलेला जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध 29 नोव्हेंबर रोजी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते फरार झाले. अंतरिम जामिनासाठी प्रयत्न करीत असून अद्याप त्यांना जामीन न मिळाल्याने नितेश कराळे कोर्टाचे खेटे खात आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी दिली आहे.
कोण आहे नितेश कराळे मास्तर? नितेश कराळे मास्तर हे मागील अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर वर ॲक्टिव असतात. त्यांची अनेक पोस्ट तरुण तरुणी साठी असतात. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोवर आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण राजकारणाने त्यांचा गेम केला अशा चर्चा संपूर्ण जिल्हात सुरू आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…