रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यातील अंबड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येते एका 11 वीत शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. एका युवकाचा जाचाला ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, अंबडमध्ये तरुणाच्या छेडछाडीला आणि धमक्यांना कंटाळून या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी 8.30 वाजता तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी युवकाकडून रस्त्यावर सतत आडवून होत असलेली छेडछाड तसेच धमक्यामुळे या तरुणीने 3 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती. मात्र युवकाने मयत तरुणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
सततच्या धमक्या आणि छेडछाडीला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊस उचलत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असून अनेक मुलींना अशाप्रकारे त्रास होत असल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या आजोबांनी केला आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…