सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे चक्क न्यायाधीशाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने संपूर्ण राज्यात न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन खळबळ माजली आहे.
कुणावरही अन्याय किंवा अत्याचार झाला तर न्याय मागण्याचे अखेरचे ठिकाण म्हणजे न्यायालय आहे. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय हा भक्कम पाया असून शासन, प्रशासन किव्हा राजकीय पक्ष यांच्या विरुद्ध लढाईसाठी न्यायालय हा अखेरचा दुवा असतो. पण न्यायदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या अशा महत्वपूर्ण स्थिकानी न्यायाधीशाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. पुणे आणि सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तिकपणे ही कारवाई सातारा येथे केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशा विरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीशा सह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका फिर्यादीच्या वडिलांना एका केस मध्ये जामिन देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीश लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…