अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर नागपूर कडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हलसने महिलेस जबर धडक दिली या अपघातात ट्रॅव्हलसच्या समोरील चाकात येऊन महिला जागीच ठार झाली असून काही काळ याठिकाणी तलावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाहतूक खोळबली होती. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मध्यस्तीने परीस्थिती नियंत्रणात आणली.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी ११ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास हळदगाव येथील सुधाबाई माणिक झाडे वय ५५ वर्ष ह्या पती माणिकराव झाडे हे शेडगाव चौरस्त्यावरील पुलाच्या कामावर सिकुरीटी गार्ड म्हणून कामावर असल्याने त्यांना जेवणाचा डब्बा आणून देऊन त्या गावाकडे परत निघाल्या असता नागपूरकडुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम एच ४९ जे ८५१६ त्यांना जबर धडक दिली या अपघातात सुधाबाई माणिक झाडे या समोरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर, गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप गाडे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्यांने वर्धेवरुन आरसीपी व दंगल पथक बोलावण्यात आले होते.
या घटनेचे गार्भीय लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी घटनास्थळ गाठले यावेळी जवळपास तासांपासून तेथे वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर परीवारातील सदस्यांनी व गावातील नागरीकांनी प्रेत उचलु देत नाही असा पवित्रा घेतला होता त्यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांनी नातेवाईकांची समजुत काढून मध्यस्थी करुन प्रेत उतरीय तपासणी करीता समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करून खोळबलेली वाहतूक सुरळीत केली. पुढिल तपास पोलीस करत आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…